support India Aghadi mp amol kolhe politics pune marathi news Sakal
पुणे

Amol Kolhe : इंडिया आघाडीला साथ द्या - खासदार अमोल कोल्हे

आगामी काळात इंडिया आघाडीत पवार साहेबांची मोठी ताकद असून त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे.

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आघाडीत मोठी ताकद असून आगामी काळात इंडिया आघाडीला साथ द्यावी असे आवाहन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांच्या बैठकीत रविवारी खासदार कोल्हे बोलत होते.

यावेळी खासदार कोल्हे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दूरदृष्टी समोर ठेवून शिरूर तालुक्यात चासकमानचे पाणी व पंचतारांकित एमआयडीसी आणली त्यामुळे परिसराचा कायापालट झाला आहे. अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. उद्योग व शेती क्षेत्रात सुधारणा झाली आहे.

आगामी काळात इंडिया आघाडीत पवार साहेबांची मोठी ताकद असून त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील परिस्थिती बदलेल असे सांगून सध्या देशासह महाराष्ट्रात बेरोजगारी व महागाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कसोटीचा काळ असला तरी पुरोगामी महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.

त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू आहे. शिरूर मतदार संघामध्ये 'इंद्रायणी मेडिसिटी' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहे.

राजकारण व समाजकार्यात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराची गरज असून पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ द्यावी. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन खासदार कोल्हे यांनी यावेळी केले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे, घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर,

प्रवक्ते बाळासाहेब ढमढेरे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ आदींनी मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार अशोक पवार यांच्या पाठीमागे आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभा असून लोकसभेची उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांना द्यावी असा आग्रह पक्षाकडे करणार असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी एकमुखाने सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष विद्या भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, निवृत्ती जकाते, दत्तात्रय टेमगिरे, शहाजी ढमढेरे, उत्तम रासकर, राजेंद्र केदारी, सुदाम भुजबळ, सोपान भुजबळ, जगदीश ढमढेरे, उमेश भुजबळ, मिनीनाथ ढमढेरे, पांडुरंग भुमकर, माऊली नरके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT