Mahanagar Survey Center in Pune Sakal
पुणे

पुण्यातील साथरोग निदान, उपचार, नियंत्रणासाठी ‘महानगर सर्वेक्षण’ची साथ

राज्यातील पहिले महानगर सर्वेक्षण केंद्र पुण्यातील बाणेर येथे लवकरच कार्यान्वित होणार आहे.

योगिराज प्रभुणे

राज्यातील पहिले महानगर सर्वेक्षण केंद्र पुण्यातील बाणेर येथे लवकरच कार्यान्वित होणार आहे.

पुणे - राज्यातील पहिले महानगर सर्वेक्षण केंद्र (Mahanagar Survey Center) पुण्यातील बाणेर येथे लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करणार असून, त्यातून साथीच्या रोगाचे सर्वेक्षण, त्याचे निदान उपचार आणि साथनियंत्रणासाठी तातडीच्या उपायांबद्दल शास्त्रीय सल्ला या केंद्रातून पुणेकरांना मिळणार आहे. (Mahanagar Survey Center in Pune)

राज्यातील कोरोनाचे पहिले रुग्ण पुण्यात आढळले. पुण्यामध्येच चौदा वर्षांपूर्वी देशातील स्वाइन फ्लूच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता, तसेच यापूर्वीही प्लेगसारख्या उद्रेकाने पुणे हादरले होते. पुण्यातील साथरोगाच्या उद्रेकाचा हा इतिहास बघून या शहरात साथरोग सर्वेक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात आले. त्यापैकी राज्यातील पहिले केंद्र पुण्यात सुरू होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पुणे दौऱ्यावर आलेल्या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागासोबत बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला.

महानगर सर्वेक्षण केंद्र म्हणजे काय?

कोरोनानंतर साथरोग सर्वेक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहेत. साथीच्या रोगाच्या सर्वेक्षणाची स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन देशातील विविध शहरांमध्ये महानगर सर्वेक्षण केंद्र सुरू करत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये ही केंद्र आहेत.

काय फायदा होणार?...

  • देशात २०१९ ते २०२० या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या भागांत विविध प्रकारच्या तापाचे ३३ उद्रेकांची नोंद झाली. त्यापैकी १२ तीव्र एन्सेफलाटयटीस सिंड्रोम आढळून आला. अशा प्रकारे तापाची माहिती सर्वेक्षणातून पुढे येईल. त्यामुळे या साथीचा प्रसार होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या पर्यायांची तातडीने अंमलबजावणी करता येईल.

  • साथरोग सर्वेक्षणासाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे केंद्र सरकारकडून पुण्याला मिळणार आहे

  • त्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.

  • साथीच्या रोगाचे अचूक निदान करण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

  • रोगनिदान झाल्यानंतर उपचार पद्धती यातून निश्चित करता येईल.

  • या केंद्रामुळे उपचाराच्या सुविधा पुणेकरांना मिळतील.

पुण्यातील साथीचा सालानुसार उद्रेक...

  • देवीची साथ - १७६९

  • हिवताप - १८८०

  • कॉलरा - १८८५

  • प्लेग - १८९६

  • स्पॅनिश फ्लू - १९१८

  • पोलिओ - १९४९

  • स्वाइन फ्लू - २००९

  • कोरोना - २०२०

पुण्यात सातत्याने साथरोगाचे उद्रेक झाले आहेत. नवीन आजारांचे निदानही येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात केंद्र सरकारच्या मदतीने महानगर सर्वेक्षण केंद्र सुरू होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आता पडले आहे. त्यातून पुण्यातील साथरोग सर्वेक्षण वाढेल आणि त्याचा थेट फायदा पुण्यातील नागरिकांना होईल.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT