Pune  sakal
पुणे

Pune : पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षप्रवेशाची घाई?अजित गव्हाणे यांच्यासह समर्थकांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

प्रशांत पाटील

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्‍यांचे समर्थक १५ माजी नगरसेवक, नऊ विविध आघाडींच्‍या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १७) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्‍या उपस्‍थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वास्तविक २० जुलै रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाचा विजयी संकल्‍प मेळाव्‍याचे आयोजन केले आहे. त्यावेळी हे प्रवेश होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यापूर्वीच हे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीमुळे एवढी घाई करण्यात आली का? असे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

पक्षप्रवेशावेळी ज्‍येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी या वेळी उपस्थित होते. अजित गव्‍हाणे यांच्‍यासह माजी महापौर वैशाली घोडेकर, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, संजय नेवाळे, वसंत बोराटे, संजय वाबळे, समीर मासुळकर, माजी नगरसेविका विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, गीता मंचरकर, वैशाली उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे आदींनी प्रवेश केला. या वेळी विशाल वाकडकर, माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडे, विशाल काळभोर, प्रसाद कोलते, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे आदी पदाधिकारी उपस्‍थित होते.

२८ पैकी १५ जण उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी एकूण २८ जणांचा प्रवेश झाल्‍याची यादी जाहीर केली आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवेशावेळी १५ माजी नगरसेवक उपस्‍थित होते. इतर १३ जणांनी प्रवेश का केला नाही, याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत.

विलास लांडे अनुपस्‍थित

माजी आमदार विलास लांडे हे देखील आज शरद पवार यांना भेटून पक्ष प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्ष प्रवेशाच्‍या कार्यक्रमाला ते उपस्‍थित राहिले नाहीत. त्‍यांच्‍या अनुपस्‍थितीमुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Limit: उद्यापासून UPI व्यवहार मर्यादा बदलणार! पेमेंटसाठी NPCI कडून नवीन नियम जाहीर, तुम्हाला होणार थेट फायदा

Lalbaugcha Raja Darshan: लालबाग राजाच्या चरणी सामान्यांचे हाल, मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, काय केला आरोप?

आई झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाले? दीपिका पादुकोणने चार शब्दात सांगितला अनुभव, बदलला इंस्टाचा बायो

Chess Olympiad 2024: भारतीय संघाचे पहिल्या चारही फेरीत वर्चस्व; महाराष्ट्राची दिव्या देशमुखचीही चमकदार कामगिरी

Hit And Run : 'हिट अँड रन' घटनेत दुचाकीवर मागे बसलेल्याचा तरुणाचा जागेवरच मृत्यू; दहिसर येथील एक्सप्रेसवेवरील प्रकार

SCROLL FOR NEXT