Supreeya Sule calls for accountability Sakal
पुणे

Supriya Sule: सरकारला फक्त मृतदेहच बघायचे आहेत का ?

Supriya Sule: नरहरी झिरवळ यांचा आत्महत्येचा प्रयत्न व पुण्यातील बलात्कार प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या !

सकाळ वृत्तसेवा

पुणे: मंत्रालयासारख्या पवित्र ठिकाणी संविधानीक पदावरील व्यक्ती व सत्तेतील आमदार असलेल्या नरहरी झिरवळ यांना जीव द्यावासा वाटतो. पुण्यासारख्या शहरात तरुणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडते, हा प्रकार दुर्दैवी, वेदनादायी व अस्वस्थ करणारा आहे. अशा घटना घडत असताना सरकारला झोप तरी कशी लागते ? सरकारला केवळ मृतदेहच बघायचे आहेत का ? असे प्रश्‍न उपस्थित करत "महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सरकारला धारेवर धरले.

शहरात घडलेल्या शालेय विद्यार्थीनींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच बोपदेव घाटात सामुहिक बलात्काराचे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. शहरातील या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सुळे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, " बोपदेव घाटात सामुहिक बलात्काराची घटना घडत असून कोणाला भितीच राहिलेली नाही. गृहमंत्र्यांना काही नैतिकता आहे की नाही. जिथे मोठे कंत्राट आहेत, तिथेच हे सरकार काम करते. इन्कमटॅक्‍स, ईडी व सीबीआय ही यंत्रणा पक्ष फोडण्यासाठी सुरळीत चालते, मग महिला सुरक्षिततेवेळी ही यंत्रणा सुरळीत कशी चालत नाही. महिला सुरक्षितता, सामुहिक बलात्कार, झिरवळांचा आत्महत्येचा प्रयत्न, या घटनांमुळे आता सरकार घालवायची वेळ आली आहे. झिरवळ यांना जीव द्यावा वाटत असेल, तर सर्वसामान्य नागरीकांवर काय वेळ येत असेल. राज्याचे गृहमंत्रालय महिलांच्या सुरक्षिततेबाबत अपयशी ठरले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा.'

राज्याच्या आर्थिक स्थितीवर सुळे यांनी बोट ठेवले, त्या म्हणाल्या, "राज्यात केवळ पक्ष, घरे फोडून नवीन क्रांती केली जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. नितीन गडकरी, राज ठाकरे यांच्यासह अनेक अर्थततज्ज्ञ त्याविषयी बोलले आहेत. राज्यावर दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे, महाराष्ट्र आर्थिक संकटात जाण्याच्या मार्गावर आहे, हे मी नव्हे तर त्यांचेच नेते म्हणत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, आर्थिक स्थिती सुरक्षित नाही. ऐन नवरात्रीतल खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. या सगळ्याला राज्य सरकारच जबाबदार आहे.'

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबाबत सुळे म्हणाल्या, "पक्ष खडतर परिस्थितीतुन जात असताना, संघर्षाच्या काळात अनेकजण पक्षासमवेत राहिले आहेत, त्यांचा पक्ष आयुष्यभर मानसन्मान ठेवेल. पक्षात येणाऱ्यांचाही मानसन्मान ठेवला जाईल. ही माझी नैतिक जबाबदारी आहे.

गृहमंत्र्यांचा हातात बंदुकीचा पोस्टर कसा ?

बदलापुर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरनंतर खुद्द गृहमंत्र्यांचेच हातात बंदुक घेतलेले पोस्टर्स सगळीकडे झळकले. गृहमंत्र्यांनी ही "मिर्झापुर वेब सिरीज' नसून बदलापुरची घटना ही राज्यातील वास्तव आहे, हे विसरु नये. राज्यातील लेकींवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत, गृह विभागाचा गुन्हेगारांना धाक नाही. एफआयआर, फास्टट्रॅक कोर्ट वेळेवर का होत नाहीत ? बलात्कार करणाऱ्यांना चौकात फाशी का होत नाही ? हा देश केवळ अदृश्‍य शक्तीच्या मनमानीने चालला असून आम्ही ते होऊ देणार नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला.

लोकसभेपासुन हवा बदलली

हर्षवर्धन पाटील व पवार कुटुंबाचे सहा दशकांपासूनचे नाते आहे. मागील दहा वर्षात ते वेगळ्या पक्षात काम करत असले तरी आमच्या नात्यात काही फरक पडला नाही. आमचा राजकीय संघर्ष होता, वैयक्तीक कधीच नव्हता. आता पुन्हा पाटील यांच्यासमवेत एकत्र काम करण्याची संधी मिळत आहे.लोकसभेपासून महाराष्ट्रात हवा बदलली आहे, अनेकजण आमच्याकडे येऊ लागले असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT