हिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी एकेरी वाहतुकीची पाहणी केली. 
पुणे

सुळे यांच्याकडून विकासाचा आढावा

सकाळवृत्तसेवा

हिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. १०) हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करून येथील वाहतुकीतील बदल, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्‍न व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. प्रलंबित रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी केलेल्या फेरबदलाचे कौतुक केले. पोलिस अधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढून घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले. 

गेल्या आठ वर्षांपासून सुळे हिंजवडीतील विविध प्रश्‍नांसाठी वारंवार बैठका घेत असल्याने त्यांच्या माध्यमातून बहुतांशी प्रश्‍न मार्गी लागले आहेत. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी मुख्य शिवाजी चौकातून आयटीतील वाहतुकीची पाहणी केली. त्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात त्यांनी पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडी ग्रामस्थ, हिंजवडी आयटी असोसिएशन, तसेच आयटीयन्स यांची संयुक्त बैठक घेत मूलभूत समस्यांचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, मयूर कलाटे, सुरेश हुलावळे, सचिन दोडके, दीपाली साखरे, श्‍यामराव हुलावळे, तसेच पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंता नीलेश मोढवे, नीलेश पाडाळे, सुधीर देशमुख, ज्ञानेंद्र हुलसुरे, रवींद्र सिन्हा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: महाराष्ट्राचा महानिकाल! भाजपच राहणार सर्वात मोठा पक्ष, पण सरकार...; एक्झिट पोल्स काय सांगतात? जाणून घ्या

Exit Poll : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाला मिळणार जास्त जागा? Chanakya Strategy Exit Poll काय सांगतो?

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाने जेतेपद राखले! फायनलमध्ये चीनला पराभवाची धुळ चारत तिसऱ्यांदा ठरले चॅम्पियन

Ulhasnagar Assembly Elections Voting : उल्हासनगरमध्ये भाजप उमेदवारांवर मतदारांना पैसे वाटल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप

SCROLL FOR NEXT