पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यात घडली. हिंजवडीच्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला. (Supriya Sule News Pune)
खासदार सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. दैनंदिन कार्यक्रम देखील त्यांनी त्याच साडीत सुरु ठेवला. यानंतर सुप्रिया सुळे साम टीव्ही सोबत बातचित केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, थोड दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, सगळे आम्ही मुळशीला कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. यावेळी तिथे मेनबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीने पटकन पेट घेतला. ते आमच्या लगेच लक्षात आलं. त्यानंतर सगल कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील मुळशी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेस उद्घाटन सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विझवली. दैव बलवत्तर सुळे यांना कोणतीही हानी झालेली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.