शिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या वतीने सीएसआर निधीतून येथील जिल्हा परिषद शाळेत केलेल्या विविध भौतिक सुधारणांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, ग्रामसेवक रंजना आघाव यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, बारामती औद्योगिक वसाहतीमधिल भारत बोर्ड सारख्या कंपन्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. ही कौतुकाची बाब आहे.तसेच पक्षाकडुनही बारामतीच्या विकासासाठी सदैव पुढाकार असतो.यामुळे बारामतीची देशात ओळख आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या विविध मागण्या सुळे यांच्याकडे मांडण्यात आल्या.याप्रसंगी भारत फोर्ज कंपनीच्या लिना देशपांडे, एस.बी.पाटील, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत, संजय काकडे, पोपट खडके, रमेश कन्हेरकर, धनंजय धुमाळ, विठ्ठल जाचक, मुख्याध्यापक नवनाथ गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सवाणे तर आभार रंजना आघाव यांनी मानले.
शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या..
सिध्देश्वर निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा भारत फोर्ज कंपनीच्या वतीने कायापालट करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या प्रयत्नातून राबविलेल्या ई क्लासरुम उपक्रमा चे सुळे यांनी कौतुक केले. पूर्वी असलेल्या शाळेचे रंगरंगोटी केल्याने चित्र बदलले आहे. शाळेच्या भिंती बोलक्या बनल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळत आहे.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.