Suryakant Bahirat Sakal
पुणे

जगण्याच्या उमेदीने सुर्यकांत बहिरट यांनी जिंकली कोरोनाची लढाई

अचानक नातवाला कोरोनाची लागन झाली, त्यानंतर घरामध्ये वहिनी, पुतन्या, बायको, मुलगा, सुन यांना देखील लागन झाली आणि संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाले.

समाधान काटे

शिवाजीनगर - जवळपास एक महिना व्हेंटिलेटरवर बेडवर (Ventilator Bed) उपचार, (Treatment) २०१५ मध्ये बायपास सर्जरी (Bypass Surgery), २०२० मध्ये तोंडाच्या कॅन्सरचे आॕपरेशन, (Cancer operation) अर्धांगवायूचे झटके (अटॅक) (Attack) आलेले असताना. या सर्व आजारांवर मात करत सुर्यकांत बहिरट (Suryakant Bahirat) (वय ७४) यांनी कोरोनाला (Corona) देखील हरवले. जगण्याची जिद्द, मनामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा, कोणतही संकट आले तर त्या संकटावर पाय ठेवून पुढे जाण्याची धडपड अंगी असल्यामुळे बहिरट आज सुखरूप घरी पोहचले. बहिरटवाडी येथे सात भाऊ, मुलं, सुना, नातवंडे असा एकात्र राहणारा परिवार. (Suryakant Bhairat won the battle of Corona with the hope of survival)

अचानक नातवाला कोरोनाची लागन झाली, त्यानंतर घरामध्ये वहिनी, पुतन्या, बायको, मुलगा, सुन यांना देखील लागन झाली आणि संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यांच्या पाठोपाठ सुर्यकांत यांना देखील कोरोनाची लागण झाली. पुण्यात विविध हॉस्पिटलमध्ये बेडसाठी धावाधाव केली. मात्र, लवकर बेड उपलब्ध झाला नाही. हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दहा ते बारा दिवस तिथं उपचार सुरू असताना तब्येत बिघडत चालली. व्हेंटिलेटर बेडची गरज पडली. मात्र, त्या हॉस्पिटलमध्ये हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने पुन्हा बेड शोधन्यासाठी धावाधाव सुरू झाली. अखेर रत्ना हॉस्पिटल सेनापती बापट रस्ता येथे बेड उपलब्ध झाला आणि तिथं उपचार सुरू झाले. रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हा एच. आर. सी. टी. स्कोर २० होता. दररोज १५ ते १८ लिटर आॕक्सिजनचा वापर होत असे. डॉ. चेतन पाटील यांनी सुर्यकांत बहिरट यांच्यावर योग्य उपचार केले. बहिरट यांनी उपचाराला देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. जगण्याची जिद्द, सकारात्मकता मनामध्ये असल्याने प्रकृती चांगली झाली आणि अखेर वेगवेगळे आजार असताना देखील सोमवार (ता. १७ मे) रोजी कोरोनावर मात करून ते घरी परतले. सुर्यकांत बहिरट हे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांचे मोठे भाऊ आहेत.

'माझ्या कुटुंबातील सदस्यांनी न खचता मला धीर दिला. घरच्यांची प्रेरणा व साथ मिळाली. मित्र परिवार चांगला असल्याने त्यांचे प्रेम कायम सोबत असते. साधं जेवण, डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने आज मी घरी आहे.'

- सुर्यकांत बहिरट कोरोनातून बरे झालेले रुग्ण.

'एक वर्षापासून कोरोनावर उपचार करत आहे. हा आजार काही कुष्ठरोग, टिबी, एड्स सारखा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. कोरोना पॉझिटिव्ह आलात तरी घाबरून जायचं नाही. घरच्यांनी सकारात्मक वातावरण ठेवायचं. कोरोनाची लक्षणं जाणवल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायचे. आजार अंगावर काढायचा नाही. अफवांवर विश्वास न ठेवता उपचारास सकारात्मक प्रतिसाद दिला तर लवकर बरे होता येते'.

- डॉ. चेतन पाटील (डी. ए. डी. एन. बी.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT