Loksabha Election  sakal
पुणे

Loksabha Election : विमानतळ, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा अलर्ट ; प्रवाशांच्या बॅगेसह संशयित वाहनांची होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे लोकसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पैशांचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पुणे विमानतळावर दाखल होणाऱ्या नॉन शेड्यूल फ्लाइट (खासगी विमान व हेलिकॉप्टर)ने येणारे प्रवासी व नेत्यांची बॅग तपासणी सुरू आहे.

निवडणूक आयोगाचे पथक व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान (सीआयएसएफ) हे संयुक्तपणे बॅगेची पाहणी करीत आहेत. तर पुणे स्थानकावर रेल्वेने दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरपीएफचे जवान बॅगेज स्कॅनर मशिनच्या माध्यमातून बॅगेची तपासणी करीत आहेत. प्राप्तिकर विभागाचे पथक देखील स्थानकावर दाखल होणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे.

निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सर्वच मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवले आहे. शहराच्या विविध भागांतील रस्त्यावर पोलिसांनी तपासणी नाकेदेखील सुरू केले आहेत. संशयित वाहनांची ऑन कॅमेरा तपासणी केली जात आहे. अशाच प्रकारे विमानतळावर दाखल होणाऱ्या नॉन शेड्यूल फ्लाइटची तपासणी सुरू आहे. मागच्या २० दिवसांत ७० हून अधिक खासगी विमान व हेलिकॉप्टर पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. या सर्वांची पाहणी झाल्याची माहिती ‘सीआयएसएफ’च्या सूत्रांनी दिली.

‘शेड्यूल’ फ्लाइटच्या प्रवाशांवर नजर

नॉन शेड्यूल फ्लाइटसाठी निवडणूक आयोगाचे पथक तपासणी करीत आहे. ‘शेड्यूल’ फ्लाइटच्या प्रवाशांची तपासणी करण्याचा अधिकार मात्र केवळ ‘सीआयएसएफ’ यांना आहे. त्यामुळे ‘सीआयएसएफ’चे जवान देखील अधिक सजगतेने प्रवाशांची व बॅगेची तपासणी करीत आहेत. ज्या राज्यांत निवडणुका आहेत. त्या राज्यांत बारकाईने तपासणी करा अशा सूचना देखील निवडणूक आयोगाने ‘सीआयएसएफ’ ला दिल्या आहेत.त्यामुळे अधिक गांभीर्याने सुरक्षा यंत्रणा काम करीत आहे.

रेल्वे स्थानकावर एकच स्कॅनर मशिन

पुणे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक लगेज स्कॅनर मशिन आहे. या मशिनच्या माध्यमातून स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची बॅग तपासली जाते. मात्र या व्यतिरिक्त स्थानकावर दाखल होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तिथे कोणतीच तपासणी करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे स्थानकाच्या अन्य भागात देखील स्कॅनर मशिन बसविणे आवश्यक आहे. संशयित व्यक्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील लक्ष ठेवले जात आहे.

रेल्वे स्थानकावर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. स्कॅनर मशिनच्या माध्यमातून बॅगेची तपासणी होत आहे. ‘आयकर’ विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे.

-प्रियांका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT