पुणे : स्वच्छंद ॲडवेंचर फाउंडेशनच्या (swacchand adventure foundation) गिर्यारोहक संघाने हिमाचल प्रदेशच्या (himachal pradesh) स्पिती व्हॅलीमधील खामेंगर भागात ६,१६० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावर नूकतीच यशस्वी चढाई केली. १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी ओमहर्ष जपे, संवेद मठपती, तृप्ती जोशी व अनिकेत कुलकर्णी या गिर्यारोहकांनी शिखरमाथा गाठला. ही या शिखरावरील प्रथम चढाई आहे. (swacchand adventure foundation Success in Spitty Valley)
एक जुलै २०२१ रोजी स्वच्छंदला पाच वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने ही मोहीम आयोजिली होती. अनिकेत कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली तीन गिर्यारोहकांच्या संघाची निवड केली. तीन जुलै रोजी संघ पुण्याहून मनालीमार्गे स्पिती व्हॅलिकडे रवाना झाला. दोन दिवसांचा ट्रेक करून चोम लेक जवळ संघाने बेस कँप लावला. त्यापुढे संघाने ॲडव्हान्स बेस कॅम्प व कॅम्प १ लावत ५,५२६ मीटर वरील समिट कॅम्प गाठला. १६ जुलैला पहाटे अडीच वाजता शिखरमाथ्याकडे प्रस्थान केले. वाटेतील १०० फूट उंचीची ५५-६० अंशाची आइस वॉल, कार्निसेड राइड व २०० मीटरचा धोकादायक ट्रॅव्हलर्स पार करत अखेर सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी शिखरमाथा गाठण्यात यश आले.
या मोहिमेला हिमाचल प्रदेशातील ‘माउंटन एक्सपीडिशन’ या संस्थेची मदत झाली. संघाबरोबरच संस्थेच्या चंदी ठाकूर, इंद्र देव ठाकूर आणि राज कृष्ण यांनीही शिखारमाथा गाठला. या शिखराचे नामकरण करण्याची संधी स्वच्छंदला मिळणार आहे. पहाटेच्या सुमारास समिटच्या वाटेवरी १०० फुटांची आइस वॉल आणि समिट रीजवरील २०० मीटरचा धोकादायक ट्रॅव्हलर्स पार करण्याचा अनुभव थरारक होता, असे तृप्ती जोशी हिने सांगितले. या मोहिमेत मला प्रथमच राउट ओपनिंग करण्याची संधी मिळाली, असे ओमहर्ष जपे म्हणाला. पहिल्याच मोहिमेत शिखरमाथा गाठण्याचा थरारक अनुभव अविस्मरणीय होता, असे संवेद मठपती याने सांगितले.
खामेंगर व्हॅली हा दुर्गम भाग असून, या भागाची अतिशय अल्प माहिती होती. या शिखरावर प्रथमच चढाई असल्यामुळे मोहिमेच्या परिणामाबाबत अनिश्चितता होती. त्याचबरोबर कोरोनाच्या निर्बंधांमुळे मोहिमेच्या पूर्वतयारीस पुरेसा वाव मिळाला नाही. तरीही संपूर्ण संघाने शिखरमाथा गाठल्यामुळे खूप आनंद झाला.
- अनिकेत कुलकर्णी, मोहिमेचा नेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.