gyanvapi swami govind dev giri maharaj sakal
पुणे

Swami Govind Dev Giri : ज्ञानवापी म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही

‘अयोध्येतील राममंदिरानंतरचे पुढचे पाऊल सर्वांसाठी भक्तीचे असले पाहिजे. न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीबाबत निकाल दिला.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - ‘अयोध्येतील राममंदिरानंतरचे पुढचे पाऊल सर्वांसाठी भक्तीचे असले पाहिजे. न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीबाबत निकाल दिला. हा हिंदू मुस्लिम विवाद असल्याचे कुणीही समजू नये. भारतात आक्रमकांनी जो अपमान केला त्या अपमानाची चिन्हे पुसली गेली पाहिजेत, हाच उद्देश मंदिर निर्माणाबाबत आहे,’ अशी भूमिका अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आळंदीत पत्रकार परिषदेत मांडली. समजदारी, प्रेम आणि शांती बाळगून मंदिरे बनविली तर सर्वजण एकमेकांमधला विवाद विसरून जातील. मंदिर निर्माण करताना त्या लोकांनाही समजावून सांगू, असेही त्यांनी सांगितले.

स्वामी गोविंददेव गिरी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आळंदीत महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, गीता परिवार, श्रीकृष्ण सेवा निधी, संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल यांच्यावतीने गीता भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत स्वामी गोविंददेव गिरी यांनी या कार्यक्रमाबाबत तसेच संत विचार, राममंदिर, ज्ञानवापी मशिदीबाबत भूमिका स्पष्ट केली.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, ‘भारतात आल्यानंतर विदेशी आक्रमकांनी अनेक मंदिरे तोडली. त्यापैकी केवळ तीन मंदिरांचे निशाण बाकी आहेत, असे अशोक सिंघल म्हणाले होते. आक्रमकांनी जो अपमान केला त्या अपमानाची चिन्हे पुसली गेली पाहिजेत. राममंदिर निर्माणानंतर उर्वरित तीन मंदिरे निर्माणबाबत अनेकांची इच्छा आहे. म्हणून सर्वांनी सहयोग दिला पाहिजे.

आक्रमकांची निशाणे नष्ट करण्याकरिता नैतिकता आणि शांतीने एकमेकांशी वार्तालाप ठेवावा. शांतीनेच सर्व काम होईल. श्रीराम सर्वांच्या मनामध्ये विराजमान आहे. समाजातील काहींना भूतकाळात नाही, तर भविष्यकाळात जीवन जगायचे आहे. त्यांना देशाचे भविष्य चांगले पाहिजे. माझ्या जन्मगावी मुस्लिम समाजाने मशिदीमध्ये नेऊन माझा सन्मान केला. ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली आणि वर्गणीही दिली.

भविष्यात जगायचे तर पूर्वीच्या घटना विसरून गेले पाहिजे. लखनौमधून आलेले दीडशेहून अधिक मुस्लीम, आम्ही सनातनी मुसलमान आहोत; आम्ही भारतीय मुसलमान आहोत, असे सांगत होते ही वस्तुस्थिती आहे.’ चांगल्या वातावरणामध्ये संस्कार आपोआप होतात. भगवंताची भक्ती, जीवनमूल्य, ज्ञानाचे, अधिष्ठानाचे वातावरण निर्माण केले तर पुढील पिढी संस्काक्षम बनेल, असे प्रतिपादन गोंविददेव गिरी यांनी केले.

सरसंघचालकांच्या उपस्थितीत सुरुवात

आळंदी येथे सोमवारी (ता. ५) सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी निघेल. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सकाळी दहा ते साडे अकरा या वेळात वेदघोषात अमृत महोत्सवाला सुरुवात होईल. सकाळी साडे अकरा ते दीड यावेळात राजेंद्रदास महाराज यांचे श्रीमद्‌भागवत कथा आहे. तसेच, सायंकाळी साडे चार ते साडे सहा यावेळात बंडातात्या कराडकर आणि रात्री चंद्रशेखर देगलूरकर यांचे कीर्तन होईल.

संतांच्या विचारांची गंगोत्री आळंदीत

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामधे स्वतःकरिता नाही तर विश्वाच्या कल्याणासाठी देणे मागितले. संपूर्ण विश्वाचा विचार करणारी जगातील एकच विभूती संत ज्ञानेश्वर माऊली आहेत. जाती, धर्म, देश, भाषा यांचा विचार करून आज एकमेकांची वाटणी होत आहे.

मात्र स्वतःच्या जीवनात अनेक अत्याचार सहन करूनही कुणाविषयी कठोर शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी वापरले नाहीत. म्हणून सगळ्या संतांच्या विचारांची गंगोत्री आळंदीत आहे. महाराष्ट्र हा ‘महा’राष्ट्र आहे, कारण तो संतांच्या विचारांवर पोसला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT