Farm Pond Sakal
पुणे

Pune News : शेततळ्यांतील दुर्घटना टळतील, फक्त एवढी काळजी घ्याच!

सकाळ वृत्तसेवा

- सागर रोकडे, पाबळ

शेततळ्यांमध्ये पडून जीवितहानीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

मार्गदर्शक सूचना...

  • शेततळ्यामध्ये त्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावात वापरऱ्या ट्युब ठेवाव्यात.

  • चहुबाजूंनी गाठी मारलेले दोरखंड ठेवावेत.

  • शेततळ्यांमध्ये दोरखंडाची चौकोनी जाळी प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर लावावी.

  • वरील चारही बाजूंना लाइफ जॅकेट बसवावे.

  • शेतकऱ्यांनी शेततळ्याला कुंपण करून घ्यावे.

या नियमांचा अभाव...

  • शेततळ्याची मोका तपासणी करताना सुरक्षा साधनांची तपासणी सक्तीची केली जात नाही.

  • तळ्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावांवर वापरल्या जाणाऱ्या ट्यूब, प्लॅस्टिक फ्लोट बसविले जात नाहीत.

  • तळ्याच्या चोहोबाजूंनी गाठी मारलेले किमान दहा-बारा दोरखंड लावले जात नाहीत.

  • प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर दोरखंडाची चौकोनी जाळी लावली जात नाही.

  • तळ्याच्या सर्व दिशांना किमान चार लाइफ जॅकेट कायमस्वरूपी ठेवले जात नाहीत.

  • चारही बाजूंनी लाकडी किंवा लोखंडी संरक्षण कंपाउंड करणे बंधनकारक केले जात नाही.

दृष्टिक्षेपातील घटना

  1. पाबळ (ता. शिरूर) येथे २२ मे २०२४ रोजी सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघेहीही रा. राहू, ता. दौंड) या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

  2. निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील शेततळ्यात २४ मे २०२४ रोजी पोहण्यासाठी गेलेल्या श्रद्धा काळू नवले (वय १४), सायली काळू नवले (वय ११), दीपक दत्ता मधे (वय ७), राधिका नितीन केदारी (वय १४) यांचा बुडून मृत्यू झाला.

  3. कळंब (ता. आंबेगाव) येथे ६ जुन २०२४ रोजी गणपीर डोंगराच्या पाठीमागील तळ्यात तेजस संजय पवळे (वय १८, रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

शेततळ्यांमध्ये पडून जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे.

- सिद्धेश ढवळे, ता. कृ. अ., शिरूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT