खडकवासला : देशात २०२४ मध्ये कोण पंतप्रधान होणार, लोकांच्या मनात नेमकं काय आहे, पंतप्रधान म्हणून लोक कोणाचे नाव घेत आहेत. असे जनमत जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज धायरीतील रस्त्यावर हातात माईक घेऊन उतरले होते.
'घर चलो' अभियानांतर्गत धायरीतील मुक्ताई गार्डन ते उंबऱ्या गणपती चौक अशी ६०० मीटर पदयात्रा काढली. दुपारी एक वाजता भर उन्हात त्यांनी ध्वनिक्षेपकाचा माईक हाती घेतला. रस्त्यात भेटलेले गृहिणी, भाजी विक्रेते, बस प्रवासी, दुकानदार, ज्यूस, भेळ, वडापाव, विक्रेते, रिक्षाचालक, पोकळे शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बावनकुळे म्हणाले, आज मी ११३६ जणांशी संवाद साधला. २०२४ मध्ये देशाचा पंतप्रधान कोण, असे विचारले त्यापैकी ११३४ जणांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असे उत्तर दिले. दोघांना प्रश्न न समजल्याने त्यांनी उत्तर दिले नाही.
आमदार भीमराव तापकीर, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, अश्विनी पोकळे, राजश्री नवले, सचिन मोरे, गणेश वर्पे, वर्षा तापकीर, ममता दांगट, सचिन बदक, किशोर पोकळे, सचिन दांगट, बापू पोकळे, दत्ता कोल्हे, रुपेश घुले, किरण दगडे, वृषाली चौधरी, संदीप पोकळे, यशवंत लायगुडे, सुशांत कुटे, अनंत दांगट, सारंग नवले, सागर भूमकर, अरुण राजवाडे, किरण बारटक्के, बाळासाहेब नवले, सुभाष नाणेकर, अशोक मते, नंदू जावळकर, अनिल मते त्यांच्या सोबत होते.
रस्त्याला खड्डे युवकाची तक्रार
‘तुम्ही आमच्या गावात आला. आनंद झाला. पावसामुळे रस्त्याला खूप खड्डे पडले आहेत. आम्ही दुचाकी चालक आहे. रस्ता लवकर दुरुस्त होतील. २०२४ ला मोदीच पंतप्रधान होतील. असे बसची वाट पाहणारे प्रदीप मोरे यांनी बावनकुळे यांना सांगितले. तर मोरे यांनी धायरीतील रायकर मळा, नऱ्हे, आबेगांव रस्त्याला खूप खड्डे आहेत. असे त्यांनी ‘सकाळ शी बोलताना सांगितले.
बावनकुळेंनी वाजवला ढोल
पदयात्रेतील ढोल ताशांचे पथक होते. यातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ही ढोल वाजवण्याचा मोह झाला. त्यांनी ढोल वाजवला. त्यानंतर आमदार तापकीर यांनी ही ताशा वाजविला. महिला, युवक यात्रेत अग्रभागी होते. कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ चा जयघोष करीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.