तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-operative Bank) ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थापन झालेली असून, बँकेमार्फत सोप्या पद्धतीने कर्ज वितरण केले जाते, बँकेत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणारे संचालक मंडळ असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची सेवा करून त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व काँग्रेस पक्ष पुरस्कृत सहकार पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील सभासद मतदार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी श्री गारटकर बोलत होते.
गारटकर म्हणाले की, पीएमआरडीए च्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला असून अशी चूक आगामी निवडणुकीत करू नका. आगामी सर्व निवडणुकीत पक्षाचा आदेश सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पाळावा. पक्षावर निष्ठा ठेवावी. कार्यकर्ता व पदाधिकारी पक्षाची मोठी ताकद असते, पक्षाचा आदेश सर्वांनी पाळावा, पक्षविरोधी काम केल्यास कोणताही पदाधिकारी असेल तर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा श्री गारटकर यांनी यावेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनल ची निवडणूक होत असून सर्वांनी एकजुटीने काम करावे आणि पुन्हा बँकेत निर्विवाद बहुमत द्यावे असे आवाहन श्री गारटकर यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांना बँकेने एक हजार आठशे कोटी रुपये शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले आहे. बँकेत आर्थिक शिस्त असून बँकेचे कार्य उत्कृष्ट चालू आहे. आमदार अशोक पवार यांच्यासारखा कर्तव्यनिष्ठ माणूस संचालक म्हणून बँकेत येणार असल्याने बँकेला अधिक बळ येणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, प्रा दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे, शिरूर -आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील आदींची भाषणे झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.