MLA Ashok Pawar sakal
पुणे

Talegaon Dhamdhere News : पुणे जिल्ह्यात साहेबांचा एकमेव शिलेदार आमदार ॲड. अशोक पवार

पुणे जिल्ह्यात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामागे राष्ट्रवादीचा एकमेव शिलेदार म्हणून आमदार ॲड. अशोक पवार राहिले आहेत.

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - पुणे जिल्ह्यात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामागे राष्ट्रवादीचा एकमेव शिलेदार म्हणून आमदार ॲड. अशोक पवार राहिले आहेत. पुढील निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता बहुमताने येणार असून, आमदार अशोक पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी राहणार आहे. साहेबांनी अनेकांना पदे दिली परंतु संकट काळामध्ये ते सोडून गेले. गेलेले जाऊ द्या, साहेबांचे लाभार्थी मात्र जागेवरच आहेत.

राष्ट्रवादीचा स्वाभिमान एकनिष्ठांनी राखला आहे. साहेबांबरोबर जे एकनिष्ठ राहिले त्यांचा राजकीय भविष्यकाळ उज्वल आहे. शिरूर तालुक्यातील साहेबांचे खांदे पुरस्कर्ते व माझे जुने सहकारी माजी आमदार सूर्यकांत पलांडे हेही बरोबर असल्यामुळे जुन्या नव्यांचा मेळ घालण्यासाठी साहेबांना सर्वांचीच मदत होणार आहे असे मत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्री. शेवाळे बोलत होते.

श्री. शेवाळे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आठवडाभरात पूर्ण करावयाच्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष नव नेतृत्व निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. जे दुसरीकडे गेले आहेत त्यांच्या रिकाम्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. युवकांनी जुन्या नव्यांचा मेळ लावून संघटनात्मक कामास प्राधान्य द्यावे असे आवाहन श्री शेवाळे यांनी केले.

यावेळी आमदार ॲड. अशोक पवार म्हणाले की, मी राजकारणात कधीही गद्दारी केली नाही. जेथे आहे तेथे प्रामाणिक काम केले आहे. विकास कामांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. अनेक मूलभूत प्रश्न मी स्वतः प्रशासनाकडे पाठपुरावा करून मार्गी लावले आहेत, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सत्ताधारी विकास कामांचे श्रेय घेत असल्याची खंत व्यक्त करून, विकास कामात सत्ताधाऱ्यांनी लोकप्रतिनिधीनाही महत्त्व दिले पाहिजे.

पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्य घालवले. शिरूर तालुक्यात औद्योगीकरण व पंचतारांकित एमआयडीसी आणली. चासकमानचे पाणी पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे आले असून त्यांचे विकासाचे दूरदृष्टी तालुक्याला वरदान ठरले आहे. युवकांनी साहेबांना साथ द्यावी, यश आपलेच आहे असे अशोक पवार यांनी आवाहन केले.

यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, काही आमदार पक्षातून गेले आहेत, त्यांना पक्षातून काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. परंतु शिवसेनेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोग काय निर्णय देणार आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे.

पक्षाचे चिन्ह मिळो अगर न मिळो आपण सर्वांनी पवार साहेबांच्या मागे राहून त्यांना साथ दिली पाहिजे. शिरूर तालुक्याला साहेबांनी मोठी मदत केली आहे. शिरूर तालुक्यासाठी साहेबांनी केलेल्या कामाची अनेक उदाहरणे श्री पलांडे यांनी यावेळी दिली.

तसेच जिल्हा बँकेचे माजी संचालक स्वर्गीय अरुणराव गायकवाड यांचे सुपुत्र स्वप्नील गायकवाड यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद दिल्याने त्यांना राजकीय भविष्य मोठे आहे. त्यांनी युवकांचे संघटन करून पवार साहेबांना साथ द्यावी असे आवाहन श्री पलांडे यांनी केले.

दरम्यान यावेळी शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करून ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार अशोक पवार यांच्या पाठीमागे आम्ही असल्याचे ठामपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT