parytan 
पुणे

प्लस व्हॅली, अंधारबन 25 ऑगस्टपर्यंत बंद

मकरंद ढमाले

माले (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील ताम्हिणी अभयारण्य परिसरातील प्लस व्हॅली, अंधारबन, ताम्हिणी परिसर जोराच्या पावसामुळे 15 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता; परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव 26 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे; तसेच सर्वांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.

पावसाळ्यात ताम्हिणी अभयारण्य परिसरातील प्लस व्हॅली, अंधारबन, ताम्हिणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. जोराच्या पावसामुळे पर्यटकांसाठी अंधारबन, प्लस व्हॅली परिसर 15 ऑगस्टपर्यंत बंद ठेवून, त्यानंतर खुला करण्यात येणार होता; परंतु अंधारबन परिसरात काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत; तर काही ठिकाणी जंगलात ट्रेकिंगच्या पायवाटांवर झाडे कोसळली आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत सुरक्षित पर्यटन शक्‍य नसल्याने 26 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी परिसर खुला करण्यात येईल. दरम्यानच्या काळात दरड हटवणे, पडलेली झाडे बाजूला काढणे, राडारोडा बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात येणार आहे; तसेच अंधारबनात मर्यादित संख्येत पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशाच्या ठिकाणी फी भरून वॉक इन पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे.

अंधारबन, प्लस व्हॅली परिसर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव 26 ऑगस्टनंतर खुला होईल. यापुढे पर्यटकांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळेल. एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 50; तसेच दिवसभरात अधिकतम 500 पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. नोंदणीसाठी ऑनलाइन नोंदणीस्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल.
अंकिता तरडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ताम्हिणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT