Tanaji Sawant  sakal
पुणे

Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्याकडून देठे कुटुंबीयांना मदतीचा धनादेश;मुलांचे पालकत्वही स्वीकारले

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : मराठा  आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबीयांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी भेट घेतली. यावेळी सावंत यांनी कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देत मुलांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

मूळ बार्शीचे व सध्या वाघोलीत वास्तव्यास असणाऱ्या प्रसाद देठे यांनी बुधवारी (ता. १९) मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. सावंत यांनी देठे कुटुंबीयांची वाघोलीत जाऊन भेट घेत सांत्वन केले. ‘माझ्या पतीचे व आमच्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाता काम नये,’ अशी अपेक्षा देठे यांच्या पत्नी व मुलांनी व्यक्त केली.

आरक्षणाचा काहीच निर्णय होत नाही, त्यामुळे खूपच हताश झाल्याने त्यांनी आत्महत्या केली; मात्र हे चुकीचेच आहे, अशी भावनाही त्यांच्या पत्नीने व्यक्त केली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, चंद्रशेखर घाडगे, राजेंद्र कुंजीर, शनी शिंगारे, शेखर पाटील, गणेश दाभाडे, ज्योती सातव आदी उपस्थित होते. दरम्यान, सकल मराठा समाजातर्फे सावंत यांना निवेदन देण्यात आले. तसेच शासकीय मदतीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT