sarthi sakal
पुणे

Pune : तारादुतांच्या रखडलेल्या नियुक्त्या होणार; सारथी समोरील आंदोलन स्थगित

सारथीच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत विविध योजना पोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या तारादुतांच्या रखडलेल्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत विविध योजना पोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या तारादुतांच्या रखडलेल्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत. मराठा संघटना आणि तारादुतांनी सारथीच्या कार्यालयासमोर बुधवारी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर सारथीकडून तसे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मराठा समाजापर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक योजना, शेतीबाबत माहिती पोचविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तारादुतांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या विविध भागांतील ४८० युवक-युवतींना दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एक महिन्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले. राज्य सरकारने त्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी ३२५ जणांना ११ महिने मुदतीची नियुक्तीपत्रे दिली. त्यानंतर तारादुतांनी दोन महिने काम केले. परंतु, कोरोनाकाळात हे काम बंद झाले. दोन महिन्यांच्या मानधनासाठी तारादुतांना आंदोलन करावे लागले. मात्र, त्यानंतर तारादूत प्रकल्प स्थगित करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारादुतांच्या प्रश्नांबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक छत्रपती संभाजीराजे आणि सारथीच्या संचालक मंडळासोबत झालेल्या बैठकीत हा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले होते. या बाबत सारथीच्या संचालकांनी प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारकडे पाठविला. परंतु, आता सारथीला स्वायत्तता दिली असल्यामुळे सारथीनेच निर्णय घ्यावा, असे पवार यांनी नुकतेच सांगितले होते. या वादात तारादूतांचे दोन वर्षांपासून हाल सुरू आहेत. ‘सारथी’च्या योजनाही गावांपर्यंत पोचत नाहीत. या पार्श्वभूमीवर तारादूत प्रकल्प सुरू करून प्रशिक्षित तारादुतांना नियुक्त्या द्याव्यात, या मागणीसाठी आंदोलनात राज्यातील विविध भागांतून तारादूत, मराठा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

"सारथीच्या संचालक मंडळाकडून निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु आंदोलनानंतर सारथीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यानंतर सारथीकडून तारादुतांच्या नियुक्त्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे."

- सचिन आडेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT