शिक्षक दिन 2021: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा एखादी व्यक्ती जन्म घेते तेव्हा त्याच आयुष्य हे कच्च्या मातीप्रमाणे असते, त्या मातीला आकार देऊन त्याचा माठ तयार होतो त्याचप्रमाणे, गुरूही त्याच्या शिष्याला योग्य शिकवण देत त्याचे आयुष्य घडवित असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा पहिला गुरू ही आई असते त्यानंतर शिक्षण घेताना शिक्षकच असतो जो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करतो. भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतात शिक्षक दिन कसा साजरा केला जातो? या दिनाचे महत्त्व काय, इतिहास काय हे आपण जाणून घेऊ या.
5 सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जंयती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जंयती दिनी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक तर होतेच त्यासोबत ते स्वंतत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. तसेच ते एक महान तत्वज्ञही आहेत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जवळपास ४० वर्ष शिक्षक म्हणून काम केले.
देशात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा
देशभरात शिक्षक दिन साजरा करण्याची पंरपरा १९६२ मध्ये सुरू झाली होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांची परवाणगी घेतली होती. त्यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, माझा जन्मदिन साजरा करण्याऐवजी शिक्षकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला पाहिजे. तेव्हा त्यांनी स्वत:च शिक्षकांच्या स्मन्मानार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून आयोजित करण्याचा विचार मांडला होता. डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन सांगतात की, ''सारे जग हे एक विश्वविद्यालय आहे जिथे त्यांनी काही ना काही शिकता आले.''
१८८८ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन यांचा जन्म झाला होता.
डॉ. राधाकृष्ण यांचा जन्म १८८८ मध्ये तामिलनाडूच्या तिरुनती नावाच्या एका गावामध्ये झाला होता. डॉ. सर्वपल्ली राधकृष्ण यांचा बालपण अत्यंत गरिबीमध्ये पार पडले होते. कृष्णन हे लहापणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. गरिबीमध्ये सुध्दा ते शिक्षण घेण्यात कूठेही मागे राहिले नाही आणि फिलोसॉफीमध्ये त्यांनी एम.ए केले. त्यानंतर १९१६मध्ये मद्रास रेजीडेंसी कॉलेजमध्ये फिलॉसॉफीमध्ये असिस्टंट प्रॉफेसर म्हणून त्यांनी काम केले आणि काही वर्षांनंतर ते प्रॉफेसर बनले. देशातील कित्येक विश्वविद्यालयमध्ये शिकविण्यासोबतच ते कोलोंबो आणि लंडन युनिवर्सिटीमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना मानक पदवीने सन्मानित करण्यात आले होते. १९४९ ते १९५२ पर्यंत मोस्कोमध्ये भारताचे राजदूत म्हणून राहिले आणि १९५२ मध्ये ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. त्यांनतंर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना भारत रत्नने सन्मानित करण्यात आले.
म्हणून आहे शिक्षक दिनाचे महत्त्व
शिक्षक दिनी विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सम्मान करण्यासाठी उत्साही असतात. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खास असतो. या खास दिवशी विद्यार्थी शिक्षकांमार्फत त्यांचे भविष्य सावारण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी आभार व्यक्त करतात. शाळा, कॉलेजमध्ये छात्र आपल्या शिक्षकांना भेट देतात आणि विशेष सन्मान समारोह आयोजित करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.