Crime_Sakal 
पुणे

पिस्तुलाचा धाक दाखवत महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी; जगताप, बऱ्हाटेविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्थिक फसवणुकीचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि जमिनीच्या व्यवहारात घेतलेले 32 लाख रुपये परत मागू नये, यासाठी एका महिलेस प्रकाश फाले, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह दहा जणांनी पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जगताप, बऱ्हाटे यांच्याविरुद्ध दाखल झालेला आर्थिक फसवणुकीचा हा पाचवा गुन्हा आहे. 

प्रकाश फाले, सविता फाले, यश फाले, अण्णा दळवी नायकवडी, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, जयेश जगताप, परवेझ जमादार आणि मयूर हरगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची कोथरूड येथे जमीन-खरेदी विक्रीची एजन्सी आहे.

2012 मध्ये प्रकाश फाले याची फिर्यादी यांच्याशी एका जागेच्या व्यवहारावरून ओळख झाली. त्यानंतर त्याने कोथरूड येथील जागेत पैसे गुंतवा, तुम्हाला दुप्पट पैसे मिळवून देतो असे आमिष दाखविले. त्यावर विश्‍वास ठेवून फिर्यादी यांनी फाले यास 32 लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी दिले. त्यानंतर जमिनीचा व्यवहार न झाल्याने फिर्यादीने त्याच्याकडे पैसे मागण्यास सुरवात केली. मात्र फाले याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात 2015 मध्ये फिर्याद दिली होती.

दरम्यान, या प्रकरणात दळवी-नायकवडी याने पैसे परत मिळवून देण्याचा बहाणा करून फिर्यादीला त्यांच्या कार्यालयात नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादी पुन्हा पैसे न मागण्यास सांगितले. शैलेश जगतापनेही पैसे मिळवून देतो असे सांगून त्यांना त्याच्या कार्यालयात बोलावले. त्यावेळी तेथे शैलेश आणि जयेश जगताप, बऱ्हाटे, फाले उपस्थित होते. फिर्यादीची फाले याच्यासमवेत भांडणे झाली. त्यावेळी बऱ्हाटे याने फालेकडे मोबाईल देऊन त्याच्याविषयी माहिती देण्यास सांगितल्या.

तेव्हा फाले याने बऱ्हाटे याच्या बातम्या, व्हिडिओ क्‍लिप दाखवून आमदाराला कसे पाया पडायला लावले, हे सांगत बऱ्हाटे काहीही करू शकतो, अशी धमकी दिली. त्यावेळी शैलेश जगतापनेही पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याच पद्धतीने संबंधित आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत देण्याचा बहाणा करून, फिर्यादीस पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांची फसवणूक केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Assembly Election 2024 Result: मालेगाव मध्यने थंडीत फोडला घाम; जिल्ह्यातील 14 मतदारसंघांचे निकाल निर्धारित वेळेत

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT