The tender for the Y flyover at Market Yard will be canceled 
पुणे

मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द

सकाळवृत्तसेवा

पुणे : मार्केटयार्ड येथील वखार महामंडळ चौकात प्रस्तावित असलेल्या वाय आकाराच्या उड्डाणपुलास व्यापाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे अखेर या कामाची निविदा पुणे महापालिकेने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा अंतिम प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.  

पुणे महापालिकेने सेव्हाल लव्हज चौकाकडून मार्केटयार्डकडे जाणाऱ्या नेहरू रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डायसप्लॉट ते गिरीधर भवन चौक असा उड्डाणपुल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हा उड्डाणपुल जेथे संपतो, तेथून १०० मीटरावर वखार महामंडळ चौक आहे. त्यामुळे हा उड्डाणपुल झाला तरी वाहतूक कोंडी कायम रहाणार आहे, त्याऐवजी या पुलाची लांबी वाढतून तो गंगाधाम चौकापर्यंत न्यावा अशी मागणी पुणे मर्चंट चेंबरने केली होती. पण याकडे दूर्लक्ष करत महापालिकेने वखार महामंडळ चौकात वाय आकाराचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले. त्यासाठी निवीदा प्रक्रीया राबवून त्यास स्थायी समितीची मान्यात घेतली होती. मात्र, या पुलाच्या आराखड्यावर नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांचा आक्षेप कायम होता. याबाबत सकाळाने अनेकवेळा वृत्त प्रकाशित केले होते.

माध्यमातील 'स्त्री' प्रतिमा कशी ?; त्याचे उत्तर 'चित्रभाषेत' 


व्यापाऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन याबाबत लोकप्रतिनिधींनी पहाणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये वाय उड्डाणपुलाची निवीदा रद्द करून हा पुल गंगाधाम चौकापर्यंत वाढविण्याची सुचना केली होती. त्यानंतर प्रशासनाने वाय उड्डाणपुलासाठी मंजुर केलेली निवीदा रद्द करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव अ‍ॅडीट समितीकडे पाठवला होता. त्यानंतर दक्षता समिती, अतिरीक्त आयुक्त (इस्टेट) आणि आयुक्तांच्या स्वाक्षरीने निवीदा रद्द होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले हे सभागृहनेते हे वाय उड्डाणपुलासाठी आग्रही होते. मात्र, महापालिकेच भाजपची सत्ता असून देखील व्यापाऱ्यांच्या विरोधापुढे पक्षाला नमते घेऊन निविदा रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी लागल्याने भिमाले यांना धक्का लागला आहे. यामागे अंतर्गत राजकारण असल्याचेही बोलले जात आहे. 

Womens Day Special; पिंक पाहिला,पण कळला का?; काळसर, गुलाबी खंजीराची वेदना...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT