fire sakal media
पुणे

मुळशी : उरवडे येथील कंपनीत आगीचे तांडव, 18 कामगारांचा मृत्यू

धोंडिबा कुंभार

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही आग लागली. या दुर्घटनेत 18 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. (mulashi uravade chemical company svs aqua technologies fire broke out eighteen dead)

उरवडे (ता. मुळशी) येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या रासायनिक कंपनीला आज (ता. 07) दुपारी भीषण आग लागली. यामध्ये 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला आहेत. 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 15 दिवसांपुर्वी देखील या कंपनीला आग लागल्याची माहिती येथील स्थानिक देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज 41 कामगार कामावर उपस्थित होते. 18 कामगार हे एसी लावून आतमध्ये माल पॅक करीत होते. त्यांची खोली बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या आगीत मंगल नागु आखाडे (खरावडे), सीमा बोराटे (बीड), संगीता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (सोलापूर), सारिका विलास कुदळे, सुरेखा तुपे (करमोळी) यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मंगल आखाडे यांचा कामाचा आजचा पहिला दिवस होता. हा पहिलाच दिवस दुर्देवाने आय़ुष्याचा शेवटचा दिवस ठरला. सुत्रांच्या माहितीनुसार, एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर तयार करण्याच काम सुरू होते. सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना कंपनीला अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल शर्थींचे प्रयत्न करत आहे.

दरम्यान, 18 कामगारांचा आतमध्ये अडकून पडल्यामुळे मृत्यू झाला. इमारतीच्या आत नसलेल्या अन्य काही कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश मिळाले. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आगीचे प्रमाण प्रचंड असल्याने 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

अग्निशमन दल आग विझवण्यासाठी पराकाष्टा करत आहे, परंतू आग मोठी आसल्याने विझवणे कठीण जात आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT