Punyabhushan Puraskar 2024 sakal
पुणे

Punyabhushan Puraskar 2024 : सर्वदूर विकासासाठी शिक्षणाचा पाया ;नारायण मूर्ती,डॉ. विजय भटकर यांचा ‘पुण्यभूषण’ने गौरव

प्रशांत पाटील

पुणे : ‘‘गेल्या काही वर्षांत भारताचा आर्थिक विकास वेगाने होत आहे, मात्र देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील आणि तळागाळातील व्यक्तींपर्यंत विकासाचा प्रवाह पोहोचायला हवा. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षणाचा पाया मजबूत रचणे गरजेचे असून शिक्षणपद्धतीतही आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे,’’ असे मत ‘इन्फोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे ३६ वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ मूर्ती यांच्या हस्ते ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, उद्योजक गजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

मूर्ती म्हणाले, ‘‘मुलांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची, समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करायला हवी. त्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. जगभरातील शिक्षणतज्ज्ञांशी आणि जीवनामध्ये यशस्वी झालेल्या अनिवासी भारतीयांशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला पाहिजे. हे बदल स्वीकारण्यात वेळ जाईल, मात्र त्यामुळे सकारात्मक परिणाम होतील.’’

मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याला ज्ञानाची दीर्घ परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा वर्धिष्णू आहे. डॉ. भटकर पुण्याचे वैभव आहेत. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याला अध्यात्माचे अधिष्ठान लाभले आहे.’’

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘डॉ. भटकर यांचा ‘परम’ महासंगणक हे केवळ एक उत्पादन नव्हते, तर ते भारताच्या प्रगतीचे प्रतीक होते, जगाला दिलेला तो एक संदेश होता. ‘आत्मनिर्भर भारत’ यामागे आज आपली जी भावना आहे, तीच यातून प्रकट झाली होती.’’

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘डॉ. भटकर यांनी ‘परम’ या महासंगणकाचा शोध लावून ‘आपणही प्रगती करू शकतो’ असा आत्मविश्वास भारतीयांना दिला. अमेरिकेने वारंवार आपल्या नाड्या आवळण्याच्या पद्धतीला डॉ. भटकर यांनी सर्वप्रथम चाप लावला. त्यांचे हे योगदान भारतीयांच्या चिरकाल स्मरणात राहील आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.’’

या वेळी सीमेवर कर्तव्य बजावत असताना जायबंदी झालेल्या जवानांचा आणि वीरमाता विद्या बारपट्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. देसाई यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. काका धर्मावत यांनी आभार मानले.

पुण्यासाठी मंत्र!

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. भटकर म्हणाले, ‘‘संगणक निर्मितीच्या माझ्या कार्यात सी-डॅकने मोठे योगदान दिले. सध्या भारतात दहा ठिकाणी सी-डॅकची केंद्रे असून लवकरच ती संख्या चौदापर्यंत नेण्यात येईल. पहिल्या क्वांटम संगणकाची निर्मिती पुण्यातच होणार, असा मला विश्वास असून पुणे हे लवकरच सर्वार्थाने जगातील मोठे शहर असेल. ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ हा पुण्यासाठी येत्या काळातील वाटचालीचा मंत्र असेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT