Ashadhi Wari sakal
पुणे

Ashadhi Wari : उन्हाच्या झळा, नामस्मरण अन् मोठी वाटचाल;संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सर्वांत मोठा टप्पा पार

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील बुधवारी लोणी काळभोर ते यवत हा २७ किलोमीटरचा सर्वांत मोठा टप्पा होता. त्यात सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत होता. मात्र, पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची पावले मुक्कामाच्या दिशेने पडत होती.‌ सोहळा रात्री साडेआठ वाजता यवत मुक्कामी पोहोचला.

राजेंद्रकृष्ण कापसे

यवत (जि.पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील बुधवारी लोणी काळभोर ते यवत हा २७ किलोमीटरचा सर्वांत मोठा टप्पा होता. त्यात सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत होता. मात्र, पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची पावले मुक्कामाच्या दिशेने पडत होती.‌ सोहळा रात्री साडेआठ वाजता यवत मुक्कामी पोहोचला. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे सोहळा गावात न आल्याने उरुळी कांचन ग्रामस्थांनी पालखीपुढे असणारा नगारखाना अडवून धरला. ग्रामीण पोलिसांनी हस्तक्षेप करत ग्रामस्थांना बाजूला केले आणि दुपारचा विसावा रस्त्यालगत केला.

संत तुकोबांच्या पादुकांना पहाटे संस्थानतर्फे अभिषेक केला. काकड आरती झाली.‌ एकादशीचा उपवास सोडत सोहळा आठ वाजता यवतच्या दिशेने निघाला. उन्हाची तीव्रता सकाळी दहानंतर वाढत गेली. उन्हामुळे वारकऱ्यांची‌ घशाला कोरड पडत होती. ठिकठिकाणी पाण्याचे वाटप सुरू होते. काळ्याभोर शेताची शिवारात उसासह नारळाची झाडं आणि हिरव्यागार शेतीचा परिसर वारकऱ्यांच्या साथीला होता. यवतला पालखी तळावर सोहळा पोहोचल्यानंतर विणेकरी, टाळकरी, आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत समाज आरती झाली.

उरुळी ग्रामस्थ नाराज

उरुळी कांचन येथे गेल्या वर्षी ग्रामस्थांच्या आग्रहाने सोहळा गावातून प्रदक्षिणा करून आला होता. यासाठी दीड दोन तास वेळ लागतो. म्हणून यंदा पालखी गावात जाणार नाही, अशी सूचना सोहळा प्रमुखांनी दिली होती. मात्र ग्रामस्थांनी पालखीच्या अग्रभागी असलेला नगारखाना अडवत तो गावात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोहळा प्रमुखांच्या सूचनेनुसार पालखी आत जाणार नाही तर रस्त्यालगत विसावा घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा रोष जाणवत होता. ‘गावात पालखी येण्याची परंपरा आहे. ती बंद करू नका, अशी मागणी होत होती. अखेर ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. पालखी यवत मुक्कामी पोचल्यानंतर संस्थान सोहळाप्रमुख यांच्याकडून उरुळी येथील घटनेबाबत चर्चा करून माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT