pune sakal
पुणे

त्या 'सोळा' जणांबाबत आरोपींची चुप्पी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होर्डिंगची Of hoardings वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच Bribe मागितल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे Dnyaneshwar Pingale याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे Percentage to the contractor पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात असे सांगितले होते. याबाबत अटक आरोपींकडे To the arrested accused तपास केला असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार Denial दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दिली.

टक्केवारीचे पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला टक्केवारी तीनऐवजी दोन करा, असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून हे १६ जण कोण आहेत. याची माहिती आरोपींकडून घेतली जात आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने स्थायी समितीच्या अध्यक्षासह इतरांचा पोलिस कोठडीतील सोमवारपर्यंत (ता. २३) वाढ केली आहे.

या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (वय ५०, रा. भोसरी), त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे (वय ५०, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक आॅपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (वय ५१, रा. वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया वय ३८, रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना सुरुवातील शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अटक आरोपींकडे त्या १६ जणांबाबत तपास केला आता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. लांडगे यांनी त्यांच्या मालमत्तेबाबत काहीही माहिती दिली नसून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हे एक मोठे रॅकेट असून यात आणखी कोण कोण सामील आहेत, याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत सात दिवस वाढ करण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेत न्यायालयाने पाचही आरोपींच्या कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT