पुणे

संविधानामुळे देशाची एकात्मता व अखंडता अबाधित; जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख

संविधान दिनानिमित्त बिबवेवाडी येथे कायदेविषयक जनजागृतीचे शिबीर

नितीन बिबवे

बिबवेवाडी : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दक्षिण पुणे वकील संघटना परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर शिबीरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून संजय देशमुख जिल्हा न्यायाधिश पुणे तथा अध्यक्ष पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण हे होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दक्षिण पुणे वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रवीण नलवडे यांनी केले.

संविधानाने नागरिकांना दिलेले मुलभूत हक्क व अधिकार खूपच महत्त्वाचे आहेत त्याचा वापर उपभोग आपण शंभर टक्के करतो मात्र संविधानामध्ये नागरिकांसाठी काही कर्तव्यही सांगितलेली आहेत त्याचे पालन सध्याच्या परिस्थितीत होणे महत्त्वाचे आहे अशी भावना अॅड. प्रवीण नलवडे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर दक्षिण पुणे वकील संघटना परिवाराचे सामाजिक उपक्रम व कार्य याबद्दलही त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी संविधानाचे महत्त्व या कायदा मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून समाजापर्यंत भारतीय राज्यघटना पोचवणे हा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले.

भारतीय राज्यघटना प्रत्येकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही टिकण्यासाठी भारतीय राज्यघटना केंद्रबिंदू आहे. भारतीय राज्यघटनेने सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देशाची लोकशाही केवळ संविधानामुळे टिकून आहे. मोठा भूप्रदेश अनेक जाती धर्म पंथ यांना एकसंध व एकत्रित ठेवण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून होत आहे.

घटनेने सर्वांनाच मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत घटनेमध्ये महिला बालके यांना महत्वपूर्ण हक्क अधिकार दिलेले आहेत महिला व बालकांसाठी जास्तीत जास्त कायदे आपल्याकडे आहेत. महिलांना स्वसंरक्षणासाठी हक्क संविधानाने आणि कायद्याने दिलेला आहे. त्याचा वापर वापर महिलांनी केला पाहिजे त्यासाठी संविधानाचे जनजागृती व कायदा तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव कार्यरत आहे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते. भारतीय राज्यघटना व महिलांचे अधिकार या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. पांडुरंग थोरवे यांनी माहिती अधिकार कायदा व नागरिकांचा अधिकार या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉक्टर वैशाली जाधव यांनी भारतीय संविधान महिला बालके व न्याय या विषयावर महिला व बालकांची घटनात्मक अधिकार त्यांच्यासाठी करण्यात आलेले कायदे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन हिंगणेकर योगेश तुपे व इतर पदाधिकारी अनेक ज्येष्ठ विधिज्ञ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला वर्ग व नागरिक वकील वर्ग उपस्थित होते. दक्षिण पुणे वकील संघटनेचे ॲड. अनिल शेडगे , कल्याण शिंदे, राजेश खळदकर ,ज्ञानेश्वर बर्डे, प्रल्हाद कदम ,विजय नलावडे ,गुरुदत्त चिल्लाळ, राहुल पिसाळ, चंदाराणी मांढरे, नेहा जांभळे, अमृता कुलकर्णी वगैरे सर्व वकील बंधू भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करिता विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला अनेक नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे वकील वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. लक्ष्मण राणे यांनी केले. आभार प्रदर्शन अॅड. दिलीप जगताप यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT