वाघोली : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या प्रसाद भागवत देठे या तरुणाच्या कुटुंबातील मुलाला व मुलीला शासकीय नोकरी द्यावी, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी व तसेच कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी. अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी लोणीकंद मंडल अधिकारी संदीप झिंगाडे व लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांना दिले.
ज्या ठिकाणी प्रसाद यांनी जीवन संपवले त्या ठिकाणी सकाळ पासून गर्दी होती. प्रसाद हे मूळचे बार्शी येथील असल्याने तेथील नातेवाईक व मित्रही आले होते. सांयकाळी सात वाजता मृतदेह आल्यानंतर लोणीकंद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही गोंधळ होऊ नये. यासाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होते. दरम्यान सकल मराठा समाजाने घटना स्थळी महसूल अधिकारी व पोलीसांना निवेदन देऊन त्यांच्या कुटुंबासाठी नोकरी, आर्थिक मदत व मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी केली.
माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ जाता काम नये
माझ्या पतीने मराठा आरक्षणासाठी जे बलिदान दिले. ते व्यर्थ जाता कामा नये. माझे कुटुंब उद्धवस्त झाले आहे. मला कोणाचाही आधार नाही. शासनाने दखल घ्यावी. अशी अपेक्षा प्रसाद देठे यांच्या पली यांनी व्यक्त केली.
प्रसाद देठे अमर रहे च्या घोषणा
देठे यांचा मृतदेह अंत्यविधी साठी घरी आणल्यानंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला. यानंतर उपस्थित नागरीकांनी प्रसाद देठे अमर रहे तसेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.