Fruit Seller  esakal
पुणे

Fruit Seller : फळ विक्रेता करत होता पर्यटकांची लूट, जागृत ग्राहकाने केली तक्रार

पर्यटक गडबडीत असल्याने व फळ विक्रेत्यावर विश्वास ठेवून केळी मोजून घेत नाही.

अमोल थोरवे

ओझर : रसायनाचा वापर करून कलिंगड लाल केल्याचा प्रकार नारायणगाव येथे उघड झाला आहे . त्यानंतर आता कोल्हे मळा येथील एक फळ विक्रेता मापात पाप करून पर्यटकांची लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा फळविक्रेता पर्यटकांना फळे देताना काटा मारतो तर एक डझन केळी देताना बारा केळी देण्याऐवजी दहा ते अकरा केळी देतो. पर्यटक गडबडीत असल्याने व फळ विक्रेत्यावर विश्वास ठेवून केळी मोजून घेत नाही.मात्र याबाबतची लबाडी एका जागृत ग्राहकाने संबंधित फळ विक्रेत्याच्या लक्षात आणून दिली असता त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे

मात्र या घटनेमुळे समाजात प्रामाणिकपणा शिल्लक राहिला आहे किंवा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. फळ विक्रेत्याकडून ग्राहकांची फसवणूक करण्याचा वेगळ्याच पध्दतीचा अवलंब केला जात आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कोल्हे मळा चौकात अनेक फळांची दुकाने आहेत. तेथे काही फळांची विक्री वजनावर,तर काही फळांची विक्री डझनावर होते. येथील एका दुकानात बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दुकानदाराकडून ग्राहकांना कमी फळे दिली जात आहेत. ग्राहकाने एक झझन केळी मागीतली तर बारापेक्षा कमी दयायची तसेच वजनावर फळे घेतली तर माप कमी दयायचे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

येथे येणारे ग्राहक रस्त्यावरचे असल्याने पुन्हा तक्रार घेऊन तो आपल्या दुकानात येणार नाही असे गृहीत धरून असे प्रकार केले जात आहेत. अनेकदा पर्यटनासाठी आलेली व्यक्ति विकत घेतलेल्या फळांचे वजन किंवा संख्या मोजत नाही.जर एखादया ग्राहकाच्या लक्षात आलेच तर "चुकून झाले असेल " म्हणून वेळ मारून न्यायची असे प्रकार वारंवार घडत आहेत.तसेच एखादया व्यक्तीने याबाबत विचारणा केली तर त्याच्या सोबत वाद घालून त्यास तेथून घालवून दयायचे असे प्रकार काही नागरिकां सोबत घडले आहेत.

जुन्नर तालुक्यातील पर्यटन व धार्मीकस्थळी तसेच ऐतिसासीक किल्ले ,लेण्या पाहण्यासाठी तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक व भाविक भक्त परिसरांतील गावचे नागरिक याच रस्त्याने प्रवास करतात. जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, अष्टविनायक गणपती ओझर लेण्याद्री, अंबा अंबालीका,भुत लिंगम, तुळाजा लेण्या, नाणेघाट,दाऱ्या घाट पाहण्यासाठी पुणे नाशिक महामार्गाने येणारे पर्यटक, प्रवासी याच रस्त्यावरून प्रवास करतात. जुन्नर तालुका पर्यटन तालुका असून येथे येणाऱ्या पर्यटकांची स्थानिक फळ विक्रेत्याकडून फसवणूक होणे हि बाब पर्यटन तालुक्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. अशा फसव्या दुकानदारामुळे शिवजन्मभूमीची बदनामी होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशानाने दखल घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT