Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Vishal Agrawal: या अपघाताबाबत सतत नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आशुतोष मसगौंडे

पुण्यात दोन दिवासांपूर्वी अलिशान पोर्शे कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या अपघाताबाबत सतत नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आपघातातील पोर्शे टायकन कारचे पर्मनन्ट रजिस्ट्रेशन अवघे 1758 रुपयांचे शुल्क न भरल्यामुळ मार्चपासून रखडले आहे. याबाबतची माहिती राज्य परिवहन विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कार अपघातास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्या मालिकीची ही पोर्शेचे असल्याचे बोलले जात आहे.

अपघातातील इलेक्ट्रिक लक्झरी स्पोर्ट्स सेडान पोर्श टायकनची किंमत 1.61 कोटी एक्स-शोरूम आहे आणि ती 2.44 कोटींपर्यंत जाऊ शकते.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात बिल्डर विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा कार चालवत होता, तेव्हा तो नशेत होता. हा अपघात रविवारी पहाटे कल्याणीनगर येथे अपघात झाला.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले की, या अपघातातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला 25 वर्षांचा होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स देण्यास बंदी घातली जाणार आहे.

महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पीटीआयला सांगितले की, बेंगळुरूमधील एका डीलरने मार्चमध्ये पोर्श कार आयात केली होती, जी नंतर तात्पुरत्या नोंदणीसह महाराष्ट्रात पाठवण्यात आली होती.

"ही कार जेव्हा पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदणीसाठी आली तेव्हा असे आढळून आले की, कारचे विशिष्ट नोंदणी शुल्क भरलेले नाही. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मालकाला शुल्क भरण्यास सांगितले गेले. पण, कार मालकाने या पोर्शेची आरटीओ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणलीच नाही,” अशी माहिती विवेक भीमनवार यांनी दिली.

पोर्शे कार अपघाताप्रकरणी अधिकाऱ्यांनी पुण्यातील दोन बार सील केले आहेत. वास्तविक, आरोपी अल्पवयीन मुलाने या बारमध्ये बसून मित्रांसोबत दारू प्यायली होती.

अल्पवयीन मुलांना दारू दिल्याच्या आरोपावरून प्रशासनाने बार सील केला आहे. महाराष्ट्रात दारू पिण्याचे वय 25 वर्षे आहे, त्यामुळे आरोपी अल्पवयीन असतानाही त्यांना दारू दिल्याबद्दल बारवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT