पुणे : "स्नेह पुणे"च्या नाट्यकलाकारांना दिल्लीच्या "नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा"द्वारे आयोजित भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या "भारत रंग महोत्सव" ह्या अत्यंत मानाच्या रंगमंचावर २० जुलै रोजी नाट्यप्रयोग सादर करण्याचा सन्मान प्राप्त झाला. "स्नेह-पुणे"तर्फे "द-प्लॅन" या नाट्यप्रयोगात संस्कार भारती-पुणे महानगरचे कलाकार सहभागी झाले होते.
विशेष बाब म्हणजे केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी यांनी "द प्लॅन"च्या प्रयोगाला पूर्ण वेळ देऊन हे संपूर्ण नाटक पाहिलं आणि नाटकांच्या लेखन आणि दिग्दर्शनाची कौतुक केले. त्याचबरोबर या नाटकाचे प्रयोग भारतभरामध्ये होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रयोगाला उपस्थित साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी अभिनेता, दिग्दर्शक योगेश सोमण यांचे नाटकाबद्दल विशेष कौतुक केले आणि एक उत्तम कलाकृती बघण्यासाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी NSD चे संचालक डॉ. रमेश गौड, संस्कार भारती अखिल भारतीय संघटन मंत्री दादा गोखले, समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सुप्रसिद्ध नाटककार पद्मश्री दया प्रकाश सिन्हा, पद्मश्री राम बहादुर राय आदी मान्यवर उपस्थित होते.
रँड वध आणि जॅक्सन वधावर आधारित 'द प्लॅन' या दीर्घांकाचा शुभारंभ १३ व १४ नोव्हेंबर २०२१ ला झाला. या नाटकाचे लेखन योगेश सोमण आणि दिग्दर्शन योगेश सोमण आणि रश्मी देव यांनी केलं आहे. याचे आत्तापर्यंत ३६ प्रयोग झाले आहेत. 'द प्लॅन' च्या आधी संस्कार भारती-पुणे महानगराची निर्मिती असलेल्या 'श्यामपट' या नाटकाला पण असाच मनाचा प्रयोग करण्याची संधी थिएटर ओलीम्पिक या आंतराष्ट्रीय नाट्य महोत्सवात २०१८ साली मिळाली होती. दिल्लीत नाट्यप्रयोग सादर झाल्याबद्दल संस्कार भारती-पुणे महानगरतर्फे कलाकारांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.