Rain esakal
पुणे

उन्हाळ्यात पावसाचे पुण्यामध्ये शतक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात यंदाच्या उन्हाळ्यात पावसाने शतक ठोकले. मार्च ते मे मध्ये शहरात १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी २५.३ मिमी पाऊस रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडला. पुढील आठवड्यातही पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

शहरात मार्चपासून उन्हाचा चटका जाणवू लागला होता. पण, २१ मार्चला विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. विदर्भामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट परिणाम पुण्यावर झाला होता. होळीनंतर उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला. पण, उत्तरेतून येणारे कोरडे वारे आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर एकत्र येत होते. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात एप्रिलच्या अखेरीस गारांचा पाऊस पडला. त्यानंतर मे मध्ये वेळोवेळी पूर्वमोसमी पावसाने लावलेली हजेरी आणि तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुण्यात झालेला जोरदार पाऊस या सर्वांचा परिणाम म्हणून यंदाच्या उन्हाळ्यात पावसाचे शतक झाले. मे च्या शेवटीही पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसाची शिवाजीनगर येथील वेधशाळेत २५.३ मिलिमीटर नोंद झाली. तर, लोहगावमध्ये ३७.८ मिलिमीटर पडला. पाषाण येथे ३२.४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

पूर्वमोसमी पावसाचा आठवडा

पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पूर्वमोसमी पाऊस कोसळेल. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल, अशी शक्यता हवामान खात्याने रविवारी व्यक्त केली. येत्या सोमवारी (ता. ३१) आकाश अंशतः ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. येत्या मंगळवारपासून (ता. १) शनिवारपर्यंत (ता. ५) पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले.

उन्हाळ्यात पडलेला पाऊस (१ मार्च ते ३० मे, सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)

पुणे .......... १२१.९

लोहगाव ..... ९७

पाषाण ........ १४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT