Pargaon Crime sakal
पुणे

Pargaon Crime : पोलिसांची दमदार कामगिरी! सराईत गुन्हेगाराकडून 11 मंदिरातील चोऱ्यांची कबुली; चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भाग, शिरूर, व खेड तालुक्यात मागील काही दिवसापासून मंदिर चोरीच्या घटना वाढल्या.

सुदाम बिडकर

पारगाव - आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या नेतृत्वाखाली पारगाव कारखाना पोलिसांनी उत्तम कामगिरी करत मंदीरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केल्याने पुणे जिल्ह्यातील नऊ तसेच नगर जिल्ह्यातील दोन असे एकूण ११ मंदीर चोरी गुन्हयांची उकल करुन एकूण चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहीती पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पुणे येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत पंकज देशमुख बोलत होते. यावेळी खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे उपस्थित होते.

पंकज देशमुख पुढे म्हणाले पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भाग, शिरूर, व खेड तालुक्यात मागील काही दिवसापासून मंदिर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, पोंदेवाडी येथील कळमजाई मंदिर या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अमोल वडेकर, संजय साळवे व मंगेश अभंग हे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गेले काही महिन्यापासून वेगवेगळया पोलीस ठाणे हद्दीत जावुन मंदीर चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करीत असताना एक संशईत इसम चोरी करत असल्याचे आढळुन आले.

सदर इसमाबाबत तांत्रिक दृष्टया तपास करून गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सी.सी.टी.व्ही. मधील इसम हा विनायक दामू जिते हा आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पारगाव (कारखाना) पोलीसांना झाली.

सदर इसम हा शिकापुर येथे येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाली असता त्यास सापळा रचून शिताफिने पोलिस हवालदार संजय साळवे व मंगेश अभंग यांनी शिकापूर येथून ताब्यात घेवुन त्यास मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने मंदिर चोरीची कबुली दिली.

त्यामुळे आरोपी विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) यांस वरील गुन्हयाचे अनुषंगाने दि. ३१ जुलै रोजी अटक केली. तो पोलीस कोठडी मध्ये असताना मंदिर चोरी बाबत त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर चोरी केल्याचे सांगीतले.

त्यास आणखी विचारपुस करून तपास केला असता त्याने शिकापुर येथील राउतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदीर, शिकापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळंमजाई मंदीर, तसेच नगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम.आय.डी.सी. येथील श्री. खंडोबा मंदिर शिव मल्हारगड पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिर चोऱ्या केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीकडून दानपेटीमध्ये दान केलेली रोख रक्कम व चलणी नाणी सोन्याचे मणी, सोन्याच्या वाटया, सोन्याची नथ,पितळी समई, देवीचा मुखवटा, साऊंड सिस्टिम,चांदीचा देवीचा मुखवटा, पितळी घंटा, चांदीचे दोन घोडे, व एक चांदीचा नंदी. चांदी मुखवटे व पितळी धातूच्या वस्तु, इलेक्ट्रॉनिक साहित्य अशा प्रकारे एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उपनिरक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके,शांताराम सांगडे, रमेश इचके, संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

पंकज देशमुख (पोलिस अधीक्षक) -

मंदिरातील चोऱ्यांच्या तपासाला आम्ही प्राधान्य देऊन जलदगतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या कारण मुद्देमाल किती गेला यापेक्षा मंदिरातील चोरी ही श्रद्धा व भावनेशी संबंधित असते.अटक केलेला सराईत गुन्हेगार हा फेब्रुवारी मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यातून जेल च्या बाहेर आल्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्याने 11 गुन्हे केले होते.

नेताजी गंधारे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) -

अटक केलेला सदर गुन्हेगार मंदिर चोऱ्यात सराईत असुन त्याने 11 गुन्हे एकट्याने केले असुन एका घटनेत तर त्याने निर्वस्त्र म्हणजे फक्त लंगोट लाऊन तोंडाला मास्क लाऊन चोरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT