There is no decision in the meeting of the Chief Minister regarding the final year examination.jpg 
पुणे

फायनल इयरच्या परीक्षे संदर्भात मुख्यमत्र्यांसह झाली बैठक, पण....

ब्रिजमोहन पाटील

पुणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होण्याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेला असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत परीक्षेचा कोणताही निर्णय झालेला नाही. हा निर्णय कायदेशीर बाबी तपासून आणखी दोन ते तीन दिवसांनी घेतला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

राज्य सरकारने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षा संदर्भात ८ मे रोजी धोरण स्पष्ट केले. यामध्ये केवळ अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे, तर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यांकनावर आधारीत गुण देऊन उत्तीर्ण केले जाईल असे जाहीर केले होते. पण त्यानंतर १९ मे रोजी राज्यात विद्यापीठ व महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न देण्याबाबत आणि ग्रेड देऊन उत्तीर्ण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पत्र पाठवून मार्गदर्शन करावे अशी मागणी सरकारने केली आहे. त्यानंतर राज्यात परीक्षेवरून राजकारण सुरू झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विटरद्वारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परीक्षा देण्यासाठी नियोजन करावे, परीक्षा रद्द करणे योग्य नाही असे निर्देश दिले होते." शिक्षणसंस्था चालक, शिक्षण तज्ज्ञ यांनी ही परीक्षा न घेतल्यास याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, हा निर्णय आता फायद्याचा वाटत असला तरी यात धोका आहे, त्यामुळे योग्य नियोजन करून परीक्षा घ्या अशी मागणी केली आहे. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लेखी परीक्षा रद्द करण्यास विरोध केला आहे. तर, युवासेना, मासू,  युक्रांद यासह इतर संघटनांनी परीक्षा होऊ नये, तसेच यूजीसी'च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही असे सांगितले आहे. परीक्षा घेण्यावरून राज्यात दोन गट पडले. 
काही विद्यापीठांनी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. 
२५ मे रोजी उदय सामंत यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. जर  तुम्हाला परीक्षा व्हाव्या वाटत असतील तर २-३ दिवसात प्रारूप आराखडा तयार करण्याचे कुलगुरूंच्या समितीला दिले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे दुपारी १२. ३० वाजता बैठक घेतली. त्यामध्ये सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील सर्व विद्यापीठांची परस्थिती, कोरोनाचा प्रभाव, कुलगुरूंची भूमिका, परीक्षा घेण्यासाठी काय तयारी केली आहे?, विद्यार्थी सुरक्षा, मानसिकता यावर चर्चा करण्यात आली. 
याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, "अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरूंशी चर्चा करण्यासाठी आज बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, कोरोनाचा धोका, करावा लागणारा प्रवास यावर चर्चा केली. त्यानंतर  आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या अंतिम पातळीवर आलेलो आहोत. मात्र,  यामध्ये कोणताही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी यावर निर्णय घेतला जाईल. 

रेल्वेचे आरक्षित तिकीट देतो सांगून मजुरांची फसवणूक करणाऱ्यास अटक

असा आहे घटनाक्रम
- यूजीसीने लाॅकडाऊन काळात देशात कशा पद्धतीने परीक्षा घ्याव्यात यासाठी समिती नेमली आहे. 
- राज्य सरकारनेही कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षेसंदर्भात अहवाल तयार करण्यात समिती नेमली
-यूजीसीची नियमावली आल्यानंतर ५ मे रोजी कुलगुरूंची बैठक घेऊन  दोन दिवसात वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी उदय सामंत यांची घोषणा.
- ८ मे रोजी  केवळ अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. 
- विविध विद्यार्थी संघटनांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली
- १९ मे रोजी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून ग्रेड देण्यासाठी 'यूजीसी'ला सामंत यांचे पत्र
-  २५ मे रोजी उदय सामंत यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. परीक्षेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना
- ३० मे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. 
- सर्वांची मते जाणून घेण्यात आली, पण अजून दोन ते तीन दिवसांनी निर्णय घेतला जाईल.

सहा व साडेसात मीटर रूंदीच्या रस्त्यावरही आता टीडीआर वापरता येणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT