Third castes should not beg on the streets Movement of Police Officer and help us in chakan chakan
पुणे

Chakan News : तृतीय पंथीयांनी रस्त्यावर भीक मागू नये ; पोलीस अधिकाऱ्याची चळवळ

तृतीयपंथीयात जनजागृती करण्यासाठी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी तृतीय पंथीयांशी चर्चा करून त्यांची बैठक घेऊन त्यांच्या आयुष्यातील जीवन सुधारण्यासाठी एक चळवळ उभारली आहे.

हरिदास कड

चाकण : रस्त्यावर तसेच जिथे वाहतूक नियंत्रक दिवे, चौक आहेत तिथे आपणाला नेहमी तृतीयपंथी रस्त्यावर थांबून वाहन चालकाकडून व इतरांकडून पैसे मागतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो हे चित्र नेहमी दिसते . चाकण, ता. खेड येथील पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात वाहतूक नियंत्रण दिव्याजवळ जवळ अनेक तृतीयपंथी रस्त्यावर उभे राहून वाहन चालकाकडून तसेच इतरांकडून पैसे मागून भीक मागतात.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच तृतीयपंथीयात जनजागृती करण्यासाठी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी तृतीय पंथीयांशी चर्चा करून त्यांची बैठक घेऊन त्यांच्या आयुष्यातील जीवन सुधारण्यासाठी एक चळवळ उभारली आहे. "सकाळ" ने वेळोवेळी चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर तसेच महामार्गांवर इतर चौकात तृतीयपंथी दिवसा, रात्री उभे राहतात वाहन चालकाकडून पैसे मागतात तसेच गैरप्रकार होतात. काही वादविवाद ही होतात.औद्योगिक वसहतीत काही लूटमारीचे प्रकार होतात.

या प्रकारांना आळा बसावा अशी मागणी नागरिकांची तसेच उद्योजक,कामगारांची होती. असे वृत्त अनेक वेळा दिले आहे.या तृतीय पंथीयांना योग्य उपदेश करावा त्यांची बैठक घ्यावी या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांना रस्त्यावर भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे.या कायद्यानुसार तीन जणावर गुन्हेही दाखल केले आहेत.तृतीय पंथीयांची चाकण पोलीस ठाण्यात बैठक घेतली त्यांना योग्य मार्गदर्शन केले व रस्त्यावर भीक मागणे कायद्याने गुन्हा आहे याबाबत माहिती दिली. त्यांनी वेगवेगळे उद्योग करावे, स्वतः च्या पायावर उभे राहावे.

काही प्रशिक्षण घ्यावे त्यासाठी पोलीस अधिकारी,कर्मचारी योग्य ती मदत करतील असे सांगितले. त्यामुळे तृतीय पंथियांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आणि रस्त्यावर उभे न राहण्याचा निर्णय घेतला.या तृतीय पंथीयात अनेक जण शिकलेले आहेत. परंतु उद्योग, व्यवसाय,काम, नोकरी न करता ते रस्त्यावर उभे राहून चालकाकडून,इतरांकडून पैसे मागून उदरनिर्वाह करायचा हा सरळसोपा धंदा ते करतात. तृतीय पंथीयात काहीजण हुशार आहेत शिकलेले आहेत परंतु त्यांना सरकारी कायद्याची अजिबात माहिती नसते.

त्यामुळे त्यांचे आयुष्य असेच रस्त्यावर उभे राहण्यात जाते. त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी याबाबत सांगितले की,"राज्यात बहुतांश ठिकाणी रस्त्यावर वाहतूक नियंत्रक दिव्याच्या ठिकाणी,चौकात तृतीयपंथी रस्त्यावर उभे राहताना पाहतो. अगदी पंधरा-वीस, पंचवीस असे तृतीयपंथी रस्त्यावर उभे राहून वाहन चालकाकडून व इतरांकडून पैसे गोळा करतात.रस्त्यावर भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे.

भीक मागत असताना अनेक गैरप्रकार घडतात.वादावादी होते काही हाणामारीचे प्रकारही घडतात.तृतीय पंथीयांनी यातून वेगळा मार्ग काढावा यासाठी त्यांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे.जे तृतीयपंथी उद्योग, काम करतील त्यांना विविध ठिकाणी काम देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. काही तृतीय पंथी दहावी,बारावी शिकलेले आहेत त्यांना पोलीस दलात भरतीची संधी देणार आहोत. त्यांना मार्गदर्शन करून परीक्षेत ते कसे यश मिळवतील यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी विशेष प्रयत्न करणार आहे.

वाहतूक नियंत्रण दिव्याजवळ चौकात उभे राहणारे दोन तृतीयपंथी अगदी दहावी, बारावी शिकलेले आहेत. त्यांना राखीव जागेनुसार पोलीस दलात भरती करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी पोलीस अधिकारी,कर्मचारी योग्य तो खर्च उचलणार आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या आयुष्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदेशामुळे इतर तृतीयपंथीयांना वेगळा मार्ग मिळण्याचा हा वेगळा प्रयत्न आहे.

तृतीयपंथी प्राची शिंदे यांनी सांगितले की, मी बारावी सायन्स नी शिकलेली आहे. पोलीस निरीक्षक कदम साहेब त्यांनी आम्हा तृतीयपंथीयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनामुळे कोणी रस्त्यावर उभे न राहता कामधंदा करून, नोकरी करून,सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवून वेगळे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत.यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब यांनी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.त्यानुसार जो दहावी मध्ये शिकत असलेला तृतीयपंथी आहे त्याला पोलीस दलात भरती करण्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार विशेष प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे तृतीय पंथीयाच्या जीवनात एक वेगळी पहाट उभी करण्याचा हा प्रयत्न आहे त्याला आम्हा सर्वांचे सहकार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT