This is not India of 1962 message to world from performance of Indian Army in Galwan Valley Ajay Bhatt  sakal
पुणे

हा १९६२ चा भारत नाहीये; गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीतून जगाला संदेश ; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

भारतीय सैन्यदलाने गलवान खोऱ्यात केलेल्या कामगिरीतून संपूर्ण जगाला भारताची ताकद समजली आहे.

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय सैन्यदलाने गलवान खोऱ्यात केलेल्या कामगिरीतून संपूर्ण जगाला भारताची ताकद समजली आहे. तसेच हा १९६२ च्या काळातला भारत नसल्याचा संदेश देखील जगात पोचवला आहे. यातून देशाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचे ही प्रदर्शन घडले आहे. आताचा भारत हा स्वतःचे हित पाहण्यास सक्षम असून कोणासमोर झुकणार नाही. असे मत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी व्यक्त केले.

सीमा रस्तेबांधणी संघटनेच्या (बीआरओ)‍ ६४ व्‍या स्थापना दिनाच्या अनुषंगाने रविवारी (ता. ७) पुण्यात ‘मुख्य अभियंता आणि उपकरणे व्यवस्थापन परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदे दरम्यान भारत-चीन दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या घडामोडींबाबत भट्ट बोलत होते.

या प्रसंगी बीआरओचे महासंचालक (डीजीबीआर) लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंह, संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल व्ही.जी खंडारे (निवृत्त) आदी उपस्थित होते.

येथील बीआरओ स्कूल आणि केंद्रात साकारण्यात आलेल्या तांत्रिक प्रशिक्षण संकुल व स्वयंचलित ड्रायव्‍हिंग ट्रॅकचे उद्घाटन भट्ट यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बीआरओच्या ‘विझन @ २०४७’ माहितीपत्रक, संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क संचालनालयाने प्रकाशित केलेल्या ‘सैनिक समाचार’ या विशेष आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.

‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाचा भाग म्हणून विकसित केलेले बीआरओ-केंद्रित सॉफ्टवेअरही यावेळी सुरू करण्यात आले. हे सॉफ्टवेअर बीआरओच्या कामकाजाच्या विविध पैलू स्वयंचलित करण्यासाठी विकसित केले गेले आहेत. याशिवाय स्वदेशी ‘७०-आर डबल लेन मॉड्युलर पुलां’च्या बांधकामासाठी बीआरओ आणि जीआरएसई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हे पूल सशस्त्र दलांच्या सामरिक तयारीला चालना देण्यासाठी मदत करतील.

राजकीय इच्छाशक्तीबाबत भट्ट म्‍हणाले, ‘‘संरक्षण क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असून गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण क्षेत्राला चांगला निधी दिला जात आहे. यामुळे सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांची निर्मितीला गती मिळत आहे. विशेषतः पाकिस्तान व चीन सारखे शेजारचे देश असताना सीमावर्ती भागात याची अत्यंत गरज आहे. संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या या प्रगतीमुळे संरक्षण क्षेत्रात सक्षम असलेल्या जगाताली पाच देशांमध्ये भारताचा ही समावेश झाला आहे.’’

फक्‍त भारतातच नाही तर मित्र देशांमध्ये ही बीआरओद्वारे विविध प्रकल्प साकारण्यात येत आहेत. यामुळे मित्र देशांसोबत संबंध अधिक घट्ट होत आहेत. तसेच दुर्गम भागातील पायाभूत सुविधांमुळे पर्यटनाला देखील हळूहळू चालना मिळत आहे. त्यामुळे बीआरओचे कार्य कौतुकास्‍पद असल्याचे ते म्हणाले.

दररोज नऊ कोटी रुपयांची बचत

सैन्यदल, हवाईदल आणि नौदलाला आवश्‍यक त्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणारा दुआ म्हणजेच बीआरओ. मागील ९ वर्षांमध्ये बीआरओने देशाच्या सीमावर्ती भागाचे चित्र बदलले आहे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीत गती आल्याने लष्कराच्या हालचाली देखील सोप्या आणि जलद झाल्या आहेत.

सीमावर्ती भागात कित्येक असे दुर्गम भाग होते, जिथे लष्कर आणि नागरिकांना संसाधने पोचविणे देखील आव्हानात्मक होते. त्या भागात बीआरओच्‍या कामगिरीमुळे आता संसाधने पोचविणे सोपे झाले असून त्यासाठी होणारा खर्च देखील पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. यामुळे प्रत्‍येक दिवसाला आपण सुमारे ९ कोटी रुपयांची बचत करत आहोत. असे ही भट्ट यांनी नमूद केले.

एकता आणि श्रद्धांजली अभियान

बीआरओच्या वतीने ‘एकता आणि श्रद्धांजली अभियान’ राबविण्यात आला. त्या अभियानांतर्गत देशाच्या विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातून माती, पाणी आणि रोपे आणली गेली. या अभियानाची सांगता रविवारी पुण्यातील बीआरओ सेंटर आणि स्‍कूल येथे अजय भट्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. तसेच त्यांच्या हस्ते या रोपांना बीआरओ आस्थापनाच्या परिसरात लावण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT