Three mobile phones laptop seized from DRDO scientist confidential information to Pakistan esakal
पुणे

Pune : ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञाकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याच्याकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून त्याने देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे ‘डीआरडीओ’च्या अहवालातून समोर आले आहे. सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात असलेल्या या शास्त्रज्ञाकडून तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

‘एटीएस’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप मोरेश्वर कुरुलकर (वय ५९, रा. दिघी, मूळ रा. शिक्षकनगर, कोथरूड) हा पुण्यातील दिघी येथील ‘डीआरडीओ’च्या (आर.ॲन्ड डी. इंजिनिअर्स) विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे.

कुरुलकर याने परदेशातील शत्रू राष्ट्रांसोबत अनधिकृत संवाद साधल्याची माहिती ‘डीआरडीओ’ला मिळाली. त्यावरून कुरुलकर हा वापरत असलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलची ‘डीआरडीओ’ अंतर्गत न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली.

या संदर्भात प्राप्त अहवालानुसार आरोपी कुरूलकर हा ‘डीआरडीओ’च्या संचालकपदी असताना पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या सतत संपर्कात होता. तसेच, त्याने शासकीय गुपिते आणि संवेदनशील माहिती व्हॉटसॲप मेसेज, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलद्वारे पाकिस्तानच्या हस्तकाला दिल्याचे समोर आले.

त्यानुसार ‘डीआरडीओ’ने हे प्रकरण मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्याकडे सोपविले. या प्रकरणी मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच, न्यायालयाने आरोपी कुरुलकर याला ९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या संदर्भात ‘डीआरडीओ’च्या पुण्यातील वरिष्ठांशी संपर्क साधला असता, त्यांनी शास्त्रज्ञ कुरूलकर याच्यावरील कारवाईबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, दिल्ली ‘डीआरडीओ’च्या वरिष्ठांकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३? सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अकोले विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT