Til Production sakal
पुणे

Til Production : तिळाच्या उत्पादनावर संक्रांत; दर राहणार तेजीत; देशात लागवडीअभावी घट

कमी लागवड आणि अवकाळी पावसामुळे यंदा तिळाच्या उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांनी घट होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कमी लागवड आणि अवकाळी पावसामुळे यंदा तिळाच्या उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम राहणार आहे. देशात सातत्याने तिळाचे उत्पादन घटत असल्याने दरात किलोमागे ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे.

इतर पिकांच्या तुलनेत तिळाच्या उत्पादनात एकरी उत्पन्न कमी मिळते. त्यामुळे देशात तिळाचे उत्पादन घटत आहे. तसेच यंदा कमी लागवड आणि अवकाळी पावसामुळेदेखील उत्पादनात मोठी घट झाली आहे. तीळ उत्पादित राज्यांत मोठ्या प्रमाणात अवेळी पाऊस झाल्याने उत्पादनाला फटाका बसला आहे.

सध्या मकरसंक्रांतीसाठी तिळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तिळाची चिक्की, रेवडी, गजक आदींसह इतर पदार्थांना मागणी असल्याने तिळाचा खप वाढला आहे. सध्याची तिळाची मागणी, देशातील शिल्लक साठा आणि उन्हाळी हंगामात येणारे नवीन उत्पादन या सर्वांचा विचार करता चार ते पाच महिने तिळाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज मार्केट यार्डातील तिळाचे व्यापारी आणि दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा यांनी व्यक्त केला आहे.

पावसामुळे हलक्या, कमी दर्जाच्या आणि डागी तिळाचे उत्पादन जास्त निघत आहे. बाजारात सध्या दर्जेदार तिळाला जास्त मागणी आहे.

तिळाचे तीन प्रकार

देशात पांढरा, लाल आणि काळा या तीन प्रकारच्या तिळाचे उत्पादन होते. पांढऱ्या तिळाचा वापर रोजच्या आहारासह मिठाईमध्येही केला जातो. काळा तीळ तेल आणि हाडांच्या मजबुतीसाठी वापरला जातो. लाल तिळाचा वापर तेल तयार करून पूजा व होमहवनासाठी केला जातो. पूर्वी तिळाचा वापर हा केवळ संक्रांतीसाठी होत असे.

या राज्यांत होते उत्पादन

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा

का वाढताहेत दर

  • जगभरात उत्पादन कमी आणि मागणीत वाढ

  • देशांतर्गत साधारणतः पाच लाख मेट्रिक टनाची गरज

  • देशांतील उत्पादित राज्यांत तिळाच्या उत्पादनात घट

  • सुदानमधून आयातीला अडचणी

  • जगभरात तिळाचा तुटवडा, जागतिक स्तरावर दरात वाढ

  • बेकरीसाठी लागणारा तीळ भारतातून निर्यात

तिळाचे उत्पादन (तीळ उत्पादन मेट्रिक टन)

२०१९-२० : ५,१३,७५०

२०२०-२१ : ४,३९,०७५

२०२१-२२ : ३,२५,०००

२०२२-२३ : १,७०,०००

तिळाचे उत्पादन परवडत नसल्याने शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळत आहेत. तसेच भारतात विविध देशांतून तीळ आयात करून त्यावर प्रक्रिया करून तो तीळ पुन्हा निर्यात केला जातो. जागतिक पातळीवर तिळाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दरात तेजी आहे. भारतातील तिळाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

- अजित बोरा, निर्यातदार आणि उपाध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT