to increase volume of voter participation of Housing Societies lok sabha election Sakal
पुणे

Vote Awareness : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचा सहभाग

जिल्ह्यातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने ३५ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार जागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक नुकतीच पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटमध्ये मतदारांची संख्या अधिक आहे. अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने ३५ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी क्यूआर कोड संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात यावा.’’

महासंघाचे अध्यक्ष पटवर्धन म्हणाले, ‘‘गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार ओळख पत्र आणि मतदार ओळख चिठ्ठी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याशी समन्वय ठेवून सोसायट्यांनी जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न करावेत.’’

‘नो युवर पोलिंग स्टेशन’

मतदारांच्या सुविधेसाठी ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांना हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मतदार नोंदणी झालेल्या जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT