दावडी, ता.२० : येथे दावडी (ता. खेड) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील तरुणांनी एकत्र येत किल्ले शिवनेरी येथून सकाळी शिवज्योत आणली. त्यानंतर दावडीच्या बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची व शिवज्योतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच संभाजी घारे, पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, उपसरपंच अनिल नेटके यांनी केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी माहिती बाबासो दिघे यांनी दिली. स्वरा साळुंके, समिक्षा गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हिरामण खेसे, सुरेश डुंबरे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा होरे, राणी डुंबरे, माधुरी खेसे, प्रियंका गव्हाणे, रूपाली गव्हाणे, मारुती बोत्रे, पांडुरंग दुंडे, हारून शेख सागर बोत्रे, बंटी साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
00884
मुळशी तालुक्यात तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती गण होते. त्यात बावधन, सूस, म्हाळुंगे ही तीन गावे महापालिकेत गेली आहेत. त्यामुळे प्रभागरचनेत थोडाफार बदल होणार, याची कुणकूण राजकारण्यांना होती. परंतु, जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गट आणि गण वाढल्याने प्रभागरचनेतही विशेषतः तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात कमालीचा बदल होण्याची शक्यता आहे. भौगोलिक आराखड्यानुसार प्रभागरचना प्रशासनाने तयार केली असून, ती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. एक गण साधारणपणे १८ ते २० हजार लोकसंख्येचा असून, गट छत्तीस ते चाळीस हजार लोकसंख्येचा तयार करण्यात आला आहे. फेररचनेमुळे गण, गटाच्या नावातही बदल होणार आहे.
भूगाव, भुकूम, पिरंगुट, हिंजवडी, जांबे, मारूंजी ही मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने अवघ्या तीन ते चार गावांचा मिळून पंचायत समितीचा एक गण तयार होईल. तर, नियोजित लोकसंख्येनुसार पंचायत समिती गणाची रचना करण्यासाठी पिरंगुट गाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेनुसार दोन गणात विभागले जाईल. मात्र, माले, कोळवण, मुठा, मोसे, रिहे या खोऱ्यातील गावे पूर्वीच्याच गणात राहतील. हिंजवडी भागातही गण गटात बदल होणार आहे.
तथापि यावेळी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींनी तालुक्याचा नकाशा, गावांची सन २०११ ची लोकसंख्या, गणगटासाठी आवश्यक लोकसंख्या याची माहिती घेऊन कोणती गावे, कोणत्या गण, गटात समाविष्ट होवू शकतात याचे आडाखे बांधत आहेत. तर, काहीजण तहसील कचेरीत जाऊन माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.