bhima-koregaon sakal
पुणे

आज विजयस्तंभ अभिवादन दिन

फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाईने परिसराचे सौंदर्य खुलले

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : पेरणेफाटा (ता. हवेली) येथे एक जानेवारीला होणाऱ्या ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसराचे सौंदर्य खुलले आहे. दरम्यान शनिवारी (ता. ३१) सायंकाळी अप्पर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख(collector dr. rajesh deshmukh), अप्पर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख(sp. dr. abhinav deshmukh) यांनी विजयस्तंभस्थळी भेट देवून तयारीचा आढावा घेतला.

यंदा ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता कोविड नियमावलीचे पालन करून अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून कार्यक्रमास सुरुवात होईल. रात्री १२ वाजता सामुहीक बुध्द वंदना व फटाक्यांची आतिषबाजी, पहाटे पाच वाजेपर्यंत वंदनीय भंते यांचे सामुदायिक अभिवादन, सकाळी लवकरच उच्चपदस्थ शासकीय व अशासकीय मान्यवरांकडून मानवंदना, त्यानंतर विजयस्तंभाला समता सैनिक दलासह सेवानिवृत्त सैनिकांकडून सलामी, तसेच विविध मान्यवरांकडूनही अभिवादन व पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. त्यानंतर येणाऱ्या सर्व अनुयायांकडून नियमित अभिवादनास सुरुवात होईल.

अभिवादन कार्यक्रमानिमित्त विजयस्तंभाला दरवर्षी फुलांची सजावट करण्यात येते. यावर्षी उंच क्रेनद्वारे प्रथमच संपूर्ण विजयस्तंभाला फुलांची सुंदर सजावट करून परिसरातील झाडांवरही हिरवे प्रकाशझोत सोडून फिरत्या प्रकाशझोतांची आकर्षक रोषणाईही करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच ८५ लाख रुपये खर्चून पेरणेफाटा ते तुळापूर फाटादरम्यान कायमस्वरूपी दुतर्फा पथदिवे लावण्यात आल्याने नगर रस्ता परिसर पथदिव्यांनी उजळला आहे.
दरम्यान, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांनीदेखील कोविड नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले.

अनुयायांसाठी सोयीसुविधा

पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, आरोग्य केंद्र, अ‍ॅम्बुलन्सची उपलब्धताकोरेगाव भीमा व पेरणे ग्रामपंचायतीतर्फे स्वागत व मदतकक्षाची उभारणी पुस्तकप्रेमींसाठी विजयस्तंभापासून काही अंतरावर वाचन साहित्य उपलब्ध कार्यक्रमाचे दूरदर्शन तसेच समाजमाध्यमांवर थेट प्रसारण करण्यात येणार ज्येष्ठ, लहान मुलांनी प्रत्यक्ष न येता घरुनच अभिवादन करण्याचे आवाहन

चोख पोलिस बंदोबस्त

अभिवादन कार्यक्रम शांततेत होण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. साडेपाच हजाराहून अधिक पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे. विजयस्तंभ व परिसराची श्वानपथक तसेच बॉम्बशोधक पथकाकडूनही तपासणी करण्यात आली आहे. अभिवादन कार्यक्रम काळात काही समाजविघातक घटक सोशल मिडियावर जातीय भावना दुखावणे, प्रक्षोभक वक्तव्य, चुकीच्या पोस्ट पसरविणाऱ्यांवर पोलिस सायबर सेलची बारकाईने नजर असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

चक्राकार पद्धतीने वाहतूक

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर नगर रस्त्यावर विजयस्तंभ परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुणे तसेच नगर बाजूने विजयस्तंभाकडे येणारी वाहनेही चक्राकार पद्धतीने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत. जिल्हा तसेच शहर हद्दीतही वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रात्री व एक जानेवारीला लोणीकंद व शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीतील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT