बारामती : जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या खटल्यात येथील जिल्हा न्यायाधीश एस. टी. भालेराव (District Judge S. T. Bhalerao)यांनी दोघांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा व १४ हजारांचा दंड ठोठावला. बापूराव रघुनाथ तनपुरे व राजेंद्र रघुनाथ तनपुरे (रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर) या दोघांना ही शिक्षा ठोठावली आहे. हा खटला सन २०१६ मध्ये दाखल केला होता.
उदमाईवाडी येथे गुरांच्या गोठ्यातील स्वच्छतागृहाचे पाणी सार्वजनिक पाटात सोडण्यात आले होते. हे पाणी का सोडले, याची विचारणा या प्रकरणातील फिर्यादी महिलेने या दोघांकडे केली होती. त्यावरून फिर्यादीसह तिच्या दिराला या दोघांनी सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ, दमदाटी केली होती. या प्रकरणी संबंधित महिलेने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी या प्रकरणी तपास करत आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.(racial slur case in indapur)
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील डी. एस. शिंगाडे यांनी चार साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली. यात बापूराव यांना तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेसह नऊ हजार रुपये दंड; तर राजेंद्र यांना तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेसह पाच हजार रुपये दंड केला. या खटल्यात सरकार पक्षाला वालचंदनगरचे सहायक फौजदार डी. एस. जगताप, एन. ए. नलवडे यांनी मदत केली.(Pune news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.