पुणे

आळंदी, पंढरपूर धर्मशाळांच्या विकासासाठी निधी मंजूर

CD

आंबेठाण, ता. १० : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या आळंदी आणि पंढरपूर धर्मशाळांच्या परिसरातील विकास कामांसाठी ४० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी वराळे (ता. खेड) येथे दिली. या विकासकामांचे मंजुरीपत्र संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या विश्वस्तांकडे त्यांनी सुपूर्द केले.

आळंदी, चऱ्होली खुर्दच्या परिसरातील भामनेर धर्मशाळेतील बंदिस्त गटार योजनेसाठी १० लाख रुपये, तसेच येथे सुरू असलेल्या सार्वजनिक सभागृहाच्या कामासाठी १० लाख रुपये, तर पंढरपूर परिसरातील शेगाव दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील संस्थेच्या धर्मशाळेच्या परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर सेवा मंडळामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० पेक्षा अधिक गावचे सभासद आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून आळंदी आणि पंढरपूर येथे अतिशय सुसज्ज अशा धर्मशाळा उभ्या केल्या आहेत.
याप्रसंगी संस्थेचे सखाराम खेंगले, किसन नवले, मंजू होले, आनंदा आवारी, किसन शिवेकर, बबुशा होले, पोपट रौंधळ, बाळू आहेरकर, स्वप्नील येवले, जयहरी डांगले, शंकर आवारी, सोपान देवाडे, बबन बेंडुरे, बबन सुतार, विठ्ठल रौंधळ, बबन शिंदे, शंकर मोहन यांच्यासह रामदास खेंगले, संजय रौंधळ, सुनील देवकर, नितीन वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.
abt 10 p2.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT