पुणे

शरीराचे तापमान ठेवा नियंत्रित!

CD

पारगाव, ता. २९ : वातावरणाच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तर पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. ऊन अधिक लागल्याने बरेच लोक आजारी देखील पडतात. ऊन लागल्याने शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघाताचा होणारा धोका टाळण्यासाठी, उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, आवश्यक ती काळजी घेणे खूप महत्त्वाचे वाटू लागले आहे.
याविषयी बोलताना पारगाव येथील (ता. आंबेगाव) आधार हॉस्पिटलचे डॉ. आशिष चव्हाण म्हणाले, ‘‘उष्णतेमुळे होणाऱ्या गंभीर स्वरूपाचा शारिरिक त्रास म्हणजे उष्माघात. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. उष्माघात झाल्यास रुग्णाला उच्चताप येऊन त्वचा गरम आणि कोरडी पडते. नाडीचे ठोके वेगात आणि जोरात होत असल्याने ह्रदयाची गती अनियंत्रित होते. फुप्फुसाला सूज येते, रक्तातील क्षारांचे प्रमाण कमी होऊन, त्याचा हृदयावर परिणाम होतो. घाम येत नाही किंवा रुग्ण अर्धवट शुद्धीत असतो. कडाक्याच्या उन्हात श्रमाचे काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास, त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असेही म्हटले जाते. यामध्ये अगोदर काही व्याधी असणाराला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’’

काय काळजी घ्यावी...
शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे
तहान लागली नाही, तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे
सरबत, तांदळाची पेज, ताक, फळांचा ज्यूस आदी पेय घ्यावे
चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक टाळणे
हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत
बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोक्यावर टोपी हवी
उन्हात जाताना रुमाल डोक्यावर ठेवावा
वृद्ध व आजारी व्यक्तीने उन्हात जाणे टाळावे

सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कडक ऊन असल्याने आपण थेट उन्हाच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे. शरीराचे तापमान शक्य तितके थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
डॉ. तुषार पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT