पुणे

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ड्रोनच्या घिरट्या

CD

पारगाव, ता. ३ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, धामणी, जारकरवाडी, पहाडदरा, मेंगडेवाडी, निरगुडसर परिसरात मंगळवारी (ता.३) रात्री एकाच वेळी चार ड्रोन ने घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या गावातील तरुणांनी एकत्र येत रात्र जागून गस्त घालत ड्रोनचा पाठलाग केला. परंतु, डोंगराच्या दिशेने ड्रोन गेला. ड्रोन फिरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने याबाबत माहिती घेऊन नागरिकांच्यामधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास धामणी परिसरात ड्रोनने घिरट्या घालायला सुरुवात केली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुण एकत्र येऊन गस्त घालू लागले. अवसरी बुद्रुक, धामणी, जारकरवाडी, पहाडदरा, मेंगडेवाडी, निरगुडसर व गावडेवाडी गावच्या काही परिसरात अज्ञात ड्रोन आकाशामध्ये फिरताना नागरिकांना दिसून आले. या ड्रोनची संख्या चार होती. बहुतांश ड्रोन हे डोंगराळ भागाच्या कडेला असणाऱ्या गावांमध्येच घिरट्या घालत होते. धामणी परिसरातील अनेक तरुण मोटारसायकलवरून ड्रोनचा पाठलाग करू लागले. परंतु, ड्रोन त्यांच्या हाती लागले नाही. निरगुडसर, मेंगडेवाडी व अवसरी बुद्रुकमधील तरुणांनी एकत्र येऊन या ड्रोनचा पाठलाग करत अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी हद्दीवरील गण्याडोंगरापर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ड्रोन पहाडदरा बाजूच्या डोंगराकडे निघून गेला


मागील काही दिवसांत चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ड्रोनच्या साह्याने चोरीच्या घटना घडलेल्या अद्यापपर्यंत आढळून आले नाही. मात्र, हे ड्रोन का फिरतात. याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- विवेक वळसे पाटील, माजी जिल्हा, परिषद उपाध्यक्ष

मागील आठ दिवसांपासून पारगाव कारखाना पोलिस ठाणे अंतर्गत या ड्रोनच्या घिरट्या वाढल्या. याबाबत प्रशासनाने या ड्रोनद्वारे काही सर्वेक्षण सुरू आहे का? हे ड्रोन उडविण्यास रात्रीच्या वेळेस कोणाला परवानगी दिली आहे का? याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, याबाबत बुधवारी(ता.३) सकाळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याशी संपर्क केला असून त्यांनी सांगितले की, मलाही काही फोन आले आहेत. प्रशासन ही याबाबत माहिती घेत आहे.
- रवींद्र करंजखेले माजी सदस्य, पंचायत समिती

एक-दोन दिवसांपासून मलाही या घटना समजल्या आहेत. आमच्या माहितीनुसार कोणतेही शासकीय सर्वेक्षण सुरू नाही. या ड्रोन संदर्भात पोलिसांना योग्य त्या कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी घाबरून न जाता या संदर्भात काही माहिती उपलब्ध झाल्यास प्रशासनाला कळवावी.
- गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी, जुन्नर-आंबेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT