पुणे

रानमेवा ठरतोय आदिवासींसाठी उदरनिर्वाहाचे साधन

CD

भुकूम, ता. ८ ः मुळशी तालुक्याच्या डोंगर दऱ्यातील करवंद, तोरणे हा रानमेवा विक्रीस सुरूवात झाली आहे. मुख्य रस्त्यावर आदिवासींकडून त्याची विक्री होत आहे. त्यामुळे या कुटुंबांना आर्थिक उत्पन्नास हातभार मिळण्यास मदत होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर, टेकड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. पूर्वीपासून करवंदांच्या जाळ्या येथे आहेत. सध्या लवासा रोड, मुळशी धरण विभागातील रस्त्यावर आदिवासी समाजातील कुटुंब करवंदं विकण्यास रस्यावर बसतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांमुळे चांगली विक्री होते. तसेच पौड, पिरंगुट बाजारपेठेच्या ठिकाणी दररोज विक्री होत असते. खारवडे येथील म्हसोबा देवस्थान येथेही विक्री चांगली होती. सध्या शाळांना सुट्या लागलेल्या आहेत. आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी सुट्टीचा उपयोग डोंगरची मैना विकून उत्पन्न कमावतात. आठवड्यातून एक दोन वेळा सकाळी डोंगरातून करवंदे तोडून आणायची व ती रस्त्यावर विकायची असा दिनक्रम त्यांचा असतो.
तोरणे हे फळ एका दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. वाटण्याच्या आकारा एवढे पांढरे असते. चवीला गोड व तुरट असते. त्याच्या जाळ्या सध्या बहरल्या आहेत.
तालुक्यात रस्ते चांगले झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी तसेच इतर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे रानमेवा व डोंगरच्या मैनेची जागेवरच मोठी विक्री होत असते. पूर्वी मुळशी धरण भागात हा मोठा व्यवसाय होता. हंगामात करवंदाचे करंडे ट्रक भरून मार्केटला जात असे. तसेच डोंगर, टेकड्याची जमीन विक्री बाहेरील पार्ट्यांना झाल्यामुळे करवंदाच्या जाळ्याही कमी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT