पुणे

भादलवाडी येथील भांडणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

CD

भिगवण, ता. ६ : भादलवाडी (ता. इंदापूर) येथे दारू पीत असताना दोघांमध्ये झालेल्या मारहाणीमध्ये एकाच्या डोक्यास गंभीर मार लागून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
दत्तात्रेय मारुती वायसे (वय ४०, रा. गोसावीवाडी, रा. कळस, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी युवराज बबन सुतार (रा. डाळज नं. १, ता. इंदापूर) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी वायसे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, युवराज सुतार व दत्तात्रेय वायसे यांच्यामध्ये १ जुलै रोजी भादलवाडी येथे दारू पीत असताना वाद झाला होता. यावेळी आरोपी युवराज याने दत्तात्रेय यांना शिवीगाळ करून डोक्यात हाताने जोराने मारहाण करून डोके जमिनीवर आदळून गंभीर जखमी करून खिशातील पैसे घेऊन निघून गेला होता. त्यांना पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करून इंदापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने आरोपीस ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT