पुणे

डोक्यात दगड घालून मदनवाडीत एकाचा खून

CD

भिगवण, ता. १५ : मदनवाडी (ता.इंदापूर) येथे दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या शिवीगाळ व भांडणातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला व खून केला. ही घटना सोमवारी (ता.१४) रात्री घडली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीस अटक केली आहे.

खुनाबाबत मंगळवारी (ता.१५) सकाळी माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. विजयकुमार विठ्ठलराव काजळे (वय ४५, रा. निरगुडे, ता.इंदापूर) असे खून झालेल्या युवकांचे नाव आहे. खूनप्रकरणी राज भगवान शिंदे (वय २०, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मदनवाडी (ता.इंदापूर) येथील गायरान परिसरामध्ये विजयुकमार व राज हे सोमवारी रात्री उशिरा एकत्र बसले होते. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर राज याने रागाच्या भरात विजयकुमारच्या डोक्यात दगड घालून खून केला.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी राज शिंदे यास अटक केली आहे.
दरम्यान, पोलिस अधिक तपास करीत आहेत, असे भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले.

00933

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT