पुणे

भोरला सुळे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

CD

भोर, ता. ६ : ‘‘विद्यार्थ्यांना खरा भारत समजून घ्यायचा असेल तर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक अवश्य वाचावे.’’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. येथील विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी वरील आपले मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुळे यांना आवडते छंद कोणते? बालपणातील आनंदाच्या आठवणी? अमेरिकेत शिकताना आलेले अनुभव? खासदार झाल्यानंतर संसदेतील पहिला दिवस कसा होता? देवावर किती श्रद्धा आहे? आपल्या वडिलांबद्दलचे मत काय? आनंदी राहण्यासाठी काय करता? राजकारणात आला नसता तर कोणते क्षेत्र निवडले असते? आदी प्रश्‍न विचारले.
यावेळी अॅड. नीलिमा गुजर, राजीव शहा, मंदार सिकजी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, यशवंत डाळ, संदीप नांगरे, विठ्ठल शिंदे, मानसिंग धुमाळ, भरत बांदल, महादेव कोंढरे, विद्या यादव, वंदन धुमाळ, नितीन धारणे, प्रवीण जगदाळे, मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे, आशा कदम, दीपाली भोसले, रागिणी भोसले, सुषमा अंबिके, संतोष मादगुडे, निवृत्ती खोपडे, सचिन दानवले, रवी जगदाळे, दत्तात्रेय महांगरे, मंगेश घोणे, संदीप अंबिके आदी उपस्थित होते. यावेळी पहिल्या टप्यात ५५ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. रूपाली नेवसे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT