पुणे

सांगवी-हरतळी गावांना जोडणारा पूल पाण्याखाली

CD

भोर, ता. ४ : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा देवघर आणि भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. नीरा नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली आहे. रविवारी (ता.४) दुपारी भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या सांगवी गुमा आणि हरतळी (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

भोर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रविवारी सकाळी फुलाच्या दोन फूट खाली पाणी होते. परंतु, पावसाचा जोर असल्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. रविवारी दुपारी अडीच वाजता पुलावरून पाणी वाहू लागले. याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन पाटील यांनी पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आणि सांगवीच्या ग्रामस्थांनी लगेच पुलाच्या दोन्ही बाजूकडे बांबू लावून पूल वाहतुकीसाठी बंद केला.

हरतळी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भोरहून पुण्याला जाणारी वाहतूक ही भोर-शिंदेवाडी-सारोळा-कापूरहोळ मार्गे वळविण्यात आली आहे.
- अरुण कदम, निवासी नायब तहसीलदार भोर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT