Sharad Pawar Ajit Pawar Sakal
पुणे

Baramati: कसे असणार बारामती लोकसभेचे भविष्य? अख्या देशाचे लागले लक्ष

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

: सकाळ वृत्तसेवा
बारामती, ता. २६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेत भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र अजित पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेत आपण त्यांच्यासोबत नसल्याचे सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणात जसे दोन गट पडले. तसेच, काहीसे वातावरण बारामतीतही तयार झाले आहे. अजित पवार यांच्या स्पष्ट राजकीय भूमिकेमुळे आगामी काळातील बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही देशातील काही मुख्य लढतींपैकी एक ठरणार, यात शंका नाही.

अजित पवार यांनी ही भूमिका घेतल्यानंतर राजकीय डावपेचांचाच हा भाग असावा, या उद्देशाने अनेकांनी सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेत या राजकीयनाट्यावर फारसे भाष्य करणे टाळले. कालांतराने अजित पवार यांनी उघडपणे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागत आपण खऱ्या अर्थाने वेगळी भूमिका घेतल्याचे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. कौटुंबिक भेटी गाठी व कार्यक्रम हा भाग वेगळा व राजकीय भूमिका वेगळी, असे त्यांनी वारंवार सांगत आपली भविष्यातील वाटचाल काय असेल, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतरही अनेकांनी हे दोन्ही नेते लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकत्र दिसतील, अशी भविष्यवाणी वर्तविली.

मात्र, रविवारी (ता. २१) अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा जाहीरपणे टीका करताना कार्यकर्त्यांनीही ठोस भूमिका घेण्याचे आवाहन करत आपण आता परतीचे दोर कापून टाकल्याचेच नमूद केले. दोन्ही डगरींवर हात ठेवून चालणार नाही, काहीतरी एक भूमिका घेत झोकून देत काम करा, असा सल्ला त्यांनी देताना शरद पवार यांनी वयाच्या अडतिसाव्या वर्षीच वसंतदादा पाटील यांना डावलून वेगळी भूमिका घेतली होती, मी साठीनंतर ही भूमिका घेतल्याची आठवण करून दिली. वयाच्या ज्येष्ठतेनुसार आता थांबून मार्गदर्शकाची भूमिका बजावा, असे आवाहन करतानाच आगामी काळात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासोबत राहणार असल्याचे ठामपणे नमूद केले.


या पूर्वी देशपातळीवरील दिग्गजांशी मी थेट संबंध ठेवत नव्हतो, वरिष्ठ वडिलधारी नेतेमंडळी असल्याने मागे राहायचो, आता मात्र माझे व मोदी व शहा यांच्याशी उत्तम संबंध असून, ते माझी कामे मार्गी लावतात, याचा आवर्जून उल्लेख करत बारामतीसह राज्यातील सर्वांनाच त्यांनी स्पष्ट संदेश दिल्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मोदींच्या ‘मिशन ३५०’साठी तयार
बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपचा कायमच पराभव झाला. आता मोदींच्या मिशन ३५० या मोहिमेसाठी बारामतीची जागा जिंकणेही भाजपला क्रमप्राप्त आहे. अजित पवार यांच्या माध्यमातूनच ही जागा जिंकणे शक्य असल्याचे मोदी व शहा यांना माहिती आहे. त्यामुळे बारामतीवर लक्ष केंद्रित करण्यास केंद्रीय पातळीवरूनच प्रारंभ झाला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार भूमिका घेणार का, अशी कायमच चर्चा राहिली. गेल्या काही दिवसांत अजित पवार यांनी योग्य वेळ येताच बारामतीतही सक्षम उमेदवार देऊ, असे सांगत ही निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच केले. आपल्याला राज्यात फिरावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेऊन प्रचार करायचा, हे सूत्रही त्यांनी ठरवून दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Political Crisis: अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार? सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण मेन्शन, 'या' तारखेला सुनावणी

Big Billion Days : खुशखबर! नथिंग 5G फोन मिळतोय 12,999 रुपयांत; एकदम ब्रँड फीचर्सच्या स्मार्टफोनवर महा डिस्काऊंट

Jalgaon Accident News : ट्रकला दुचाकी धडकल्याने बापलेकाचा मृत्यू; पत्नी गंभीर

Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीप्रकरणी 30 जणांना अटक; इमामनगरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

SCROLL FOR NEXT